कृष्णप्पा गौथम चमकला, CSK कडून ९.२५ कोटींची बोली !

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कर्नाटकचा ३२ वर्षीय अनकॅप प्लेअर कृष्णप्पा गौथमने चेन्नईत सुरु असलेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. कर्नाटकच्या या अनुभवी अष्टपैलू खेळाडूसाठी चेन्नई सुपरकिंग्जने तब्बल ९ कोटी २५ लाख रुपये मोजले आहेत. यासोबत गौथम आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा अनकॅप खेळाडू ठरला आहे.

ADVERTISEMENT

आयपीएल २०२० नंतर पंजाबच्या संघाने कृष्णप्पा गौथमला संघातून रिलीज केलं होतं. याआधी आयपीएलमध्ये सर्वात महागडा अनकॅप खेळाडू ठरण्याचा मान मुंबई इंडियन्सच्या कृणाल पांड्याच्या नावावर जमा होता. कृणालसाठी मुंबईने २०१८ साली ८ कोटी ८० लाख रुपये मोजले होते. कृष्णप्पा गौथमला संघात दाखल करुन घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघही शर्यतीत होते.

कृष्णप्पा गौथमने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. २०१८ साली त्याने १३ विकेट घेतल्या होत्या. आयपीएलव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळण्याचा चांगला अनुभव गौथमच्या पाठीशी आहे.

हे वाचलं का?

अवश्य वाचा – CSK ची सरप्राईज खेळी, ५० लाखांच्या बोलीवर पुजाराला संघात स्थान

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT