IPL 2021 : CSK च्या विजयात पुण्याचा ऋतुराज गायकवाड चमकला, MI वर २० धावांनी मात
युएईत सुरु झालेल्या आयपीएलच्या उर्वरित हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली आहे. चेन्नई सुपरकिंग्जने मुंबईवर २० रन्सनी मात करत धडाक्यात सुरुवात केली आहे. पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईकडून सलामीला खेळताना केलेली नाबाद ८८ धावांची खेळी महत्वपूर्ण ठरली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचे प्रयत्न या सामन्यात तोकडे पडले. सौरभ तिवारीने नाबाद शतक झळकावलं पण […]
ADVERTISEMENT
युएईत सुरु झालेल्या आयपीएलच्या उर्वरित हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली आहे. चेन्नई सुपरकिंग्जने मुंबईवर २० रन्सनी मात करत धडाक्यात सुरुवात केली आहे. पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईकडून सलामीला खेळताना केलेली नाबाद ८८ धावांची खेळी महत्वपूर्ण ठरली.
ADVERTISEMENT
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचे प्रयत्न या सामन्यात तोकडे पडले. सौरभ तिवारीने नाबाद शतक झळकावलं पण मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करण्यात तो अपयशी ठरला.
टॉस जिंकून चेन्नई सुपरकिंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. परंतू त्यांची सुरुवात खराब झाली. फाफ डु-प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायुडू, सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी हे बिनीचे शिलेदार एकामागोमाग एक आऊट होत गेल्यामुळे चेन्नईची अवस्था ४ बाद २४ अशी झाली. परंतू यानंतर ऋतुराज गायकवाडने एक बाजू लावून धरत चेन्नईचा डाव सावरला. ऋतुराजने जाडेजा आणि ब्राव्हो सोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत चेन्नईला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. या दरम्यान ऋतुराजने आपलं अर्धशतकही साजरं करत संघाला १५६ धावांपर्यंत मजल मारुन दिली.
हे वाचलं का?
प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सची सुरुवात आश्वासक झाली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अनमोलप्रीत सिंग क्विंटन डी-कॉक सोबत सलामीला आला. दीपक चहरने डी-कॉकला आऊट करत मुंबईची सलामीची जोडी फोडली. अनमोलप्रीत सिंग फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात दीपक चहरच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर मुंबईच्या डावाला लागलेली गळती कायम राहिली. एकही फलंदाज मोक्याच्या क्षणी भागीदारी करुन संघाला स्थैर्य देऊ शकला नाही. मधल्या फळीत सौरभ तिवारीने प्रयत्न केले परंतू त्याला दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. अखेरीस १५६ धावांचं आव्हान पूर्ण करण्यात मुंबई २० रन्सनी कमी पडली.
या विजयासह १२ गुण मिळवत चेन्नई गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहचली आहे. मुंबईचे आतापर्यंत ८ पैकी ४ विजय आणि ४ पराभव झाले असून ते ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. त्यामुळे आपलं आव्हान कायम राखण्यासाठी मुंबईला आगामी सामन्यांत मोठ्या विजयाची गरज आहे.
ADVERTISEMENT
Virat Kohli चा महत्वाचा निर्णय, IPL 2021 नंतर RCB ची कॅप्टन्सी सोडणार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT