IPL 2021 Explainer : ऋषभ पंत की अजिंक्य रहाणे? कोण असेल Delhi Capitals चा नवा कॅप्टन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

युएईत पार पडलेल्या आयपीएलचा तेरावा सिजन दिल्ली कॅपिटल्ससाठी अत्यंत चांगला ठरला. अंतिम फेरीत मुंबईसमोर त्यांची डाळ शिजली नाही…पण संपूर्ण स्पर्धेत दिल्लीने केलेली कामगिरी ही खरंच कौतुकास्पद होती. तेरावा हंगाम संपतो न संपतो तोच बीसीसीआयने चौदाव्या हंगामाची घोषणा केली असून ९ एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. पण या हंगामाला सुरुवात होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्ससमोर एक संकट तयार झालंय. भारत विरुद्ध इंग्लंड वन-डे सिरीजमध्ये पहिल्या मॅचमध्ये फिल्डींग करत असलेल्या श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावं लागलं.

श्रेयसच्या दुखावलेल्या खांद्याचं स्कॅनिंग करुन सर्व मेडीकल टेस्ट करण्यात आल्यात. ज्यानंतर त्याच्या खांद्याला झालेली दुखापत ही गंभीर असल्याचं समोर आलंय. इंग्लंडविरुद्ध उर्वरित वन-डे सिरीजमधून श्रेयस बाहेर पडलाच आहे. पण आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांनाही श्रेयस मुकण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस कदाचीत पूर्ण आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. अद्याप दिल्ली कॅपिटल्सने याबद्दलची अधिकृत घोषणा केली नसली तरीही सध्याची त्याती दुखापत पाहता त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह नक्कीच तयार झालंय. अशा परिस्थितीत श्रेयसच्या गैरहजेरीत दिल्लीचं नेतृत्व करणार कोण हा प्रश्न निर्माण झालाय. दिल्लीचा सध्याचा संघ पाहता ऋषभ पंत, शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन आणि स्टिव्ह स्मिथ असे भक्कम पर्याय उपलब्ध आहेत.

पण या सर्वांमध्ये संधी द्यायची तरी कोणाला हा प्रश्न दिल्ली कॅपिटल्सच्या टीम मॅनेजमेंटसमोर असणार आहे. आजच्या या लेखात आपण दिल्लीची कमान कोण सांभाळणार हे समजावून घेण्याचा प्रयत्न करुया…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१) पृथ्वी शॉ –

पृथ्वी शॉ बद्दल. ऑस्ट्रेलिया टूरमध्ये खराब कामगिरीमुळे चर्चेत आलेल्या पृथ्वी शॉवर नंतर प्रचंड टीका झाली. परंतू यानंतर पृथ्वीने स्वतःला सावरत मुंबईचं विजय हजारे ट्रॉफीत नेतृत्व केलं आणि संघाला विजेतेपद मिळवून दिलं. या स्पर्धेत पृथ्वी सर्वाधिक धावा काढणारा बॅट्समन होता. याव्यतिरीक्त U-19 World Cup मध्ये पृथ्वीला कॅप्टन्सीचा अनुभव आहे. पण कामगिरीत सातत्याचा असलेला अभाव आणि संघात एवढे दिग्गज अनुभवी प्लेअर असताना पृथ्वी शॉचा कॅप्टन्सीसाठी विचार होणं अशक्य आहे.

ADVERTISEMENT

२) अजिंक्य रहाणे –

ADVERTISEMENT

अजिंक्य रहाणेकडे आयपीएलमध्ये कॅप्टन्सीचा अनुभव असला तरीही दिल्लीमध्ये त्याचा विचार कॅप्टन्सीसाठी केला जाईल याची शक्यताही कमीच आहे आणि याला कारणीभूत ठरलंय अजिंक्यची टी-२० मधली खराब कामगिरी. दिल्लीच्या संघाचं स्ट्रक्चर पाहता अजिंक्य रहाणेला पूर्णपणे १४ मॅच खेळायला मिळतील याचीही खात्री देता येत नाही. कारण अजिंक्य रहाणेला चौदाही सामने खेळवले तर त्याला ओपनिंगला यावं लागेल. कारण दिल्ली कॅपिटल्सच्या मिडल ऑर्डरमध्ये अजिंक्य रहाणेसारखा प्लेअर फिट होत नाही. मिडल ऑर्डरमध्ये येणाऱ्या बॅट्समनकडे फटकेबाजी करण्याची मोठी जबाबदारी असते पण दुर्दैवाने अजिंक्य प्रत्येक वेळी मिडल ऑर्डरमध्ये गरजेच्या वेळी मॅच जिंकवून देईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला ओपनिंगसाठी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हीच जोडी योग्य ठरते.

टी-२० मध्ये तिसऱ्या क्रमांकाची जागाही महत्वाची आहे. त्यामुळे पृथ्वी आणि शिखर नंतर लगेच अजिंक्यला तिसऱ्या नंबरवर संधी मिळेल याची खात्री देता येत नाही. जर दिल्ली कॅपिटल्सवर अजिंक्य रहाणेला सर्व मॅचमध्ये खेळवण्याची वेळ आली तर संघाचा बॅलन्स बिघडण्याची शक्यता आहे. कारण मिडल ऑर्डरमध्ये दिल्लीकडे बॅकअप म्हणून एकही भारतीय बॅट्समन नाहीये. त्यामुळे गेल्या हंगामाप्रमाणे जर पृथ्वी शॉची कामगिरी खराब होत असेल तरच अजिंक्यला ओपनिंगला संधी मिळू शकते. याशिवाय पहिली विकेट लवकर पडली आणि तिसऱ्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेला संधी देता येऊ शकते…पण ज्यावेळी दिल्लीच्या संघात स्टिव्ह स्मिथ, स्टॉयनिस, पंत यासारखे प्लेअर असताना अजिंक्य रहाणेला तिसऱ्या पोजिशनवर संधी मिळेल याची शक्यता पुन्हा एकदा कमीच आहे. अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेचाही दिल्लीच्या कॅप्टन्सीसाठी विचार होणं कठीण दिसतंय.

३) ऋषभ पंत –

मुळचा दिल्लीकर असलेला ऋषभ पंत टीमचा व्हाइस कॅप्टन आहे. त्यातच ऑस्ट्रेलिया टूरपासून ऋषभने स्वतःला ज्या पद्धतीने प्रूव्ह केलंय, ते पाहता कदाचीत दिल्लीचं मॅनेजमेंट ऋषभ पंतला कॅप्टन्सीसाठी विचार करु शकतं. खरं पहायला गेलं तर या निर्णयात प्रचंड रिस्क आहे…पण ज्याप्रमाणे राजस्थानच्या टीमने मोठं पाऊल उचलत संजू सॅमसनसारख्या तरुण खेळाडूकडे नेतृत्व सोपवलं ते पाहता दिल्लीचं मॅनेजमेंटही असा विचार करु शकतं. ऋषभला कॅप्टन्सी दिली तर त्याला मार्गदर्शन करायला अनेक अनुभवी प्लेअर्स संघात उपलब्ध आहेत, त्यामुळे असा प्रयोग दिल्लीचं मॅनेजमेंट नक्कीच करु शकतं. पण पंतकडे कॅप्टन्सीचा नसलेला अनुभव…कॅप्टन्सीची जबाबदारी आली तर त्याच्या खेळावर परिणाम होणार नाही ना या गोष्टींकडेही दिल्लीच्या मॅनेजमेंटला पहावं लागणार आहे. परंतू ऋषभचा सध्याचा फॉर्म पाहता यंदा नाही तर भविष्यात तरी ऋषभचा कॅप्टन्सीसाठी विचार होऊ शकतो.

पहिल्या ३ पर्यायांचा विचार केला असता ऋषभ पंतशिवाय दिल्ली कॅपिटल्सकडे स्टिव्ह स्मिथ, रविचंद्रन आश्विन आणि शिखर धवन हे पर्याय आहेत. यापैकी धवनकडे कॅप्टन्सीचा अनुभव असल्यामुळे त्याचाही विचार केला जाऊ शकतो. परंतू कामगिरीतलं सातत्य हा त्याच्यासाठी कळीचा मुद्दा ठरतो. अशा परिस्थितीत स्टिव्ह स्मिथ आणि रविचंद्रन आश्विन हे पर्यायही दिल्लीकडे उपलब्ध आहेत. स्मिथ आणि आश्विन या दोघांकडेही कॅप्टन्सीचा चांगला अनुभव आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही प्लेअर्स संघात आपलं महत्वाचं योगदान देऊ शकतात. त्यामुळे दिल्लीचं टीम मॅनेजमेंट या पर्यायांचाही विचार नक्कीच करु शकतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT