Virat Kohli चा महत्वाचा निर्णय, IPL 2021 नंतर RCB ची कॅप्टन्सी सोडणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताच्या टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलेल्या विराट कोहलीने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२१ नंतर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची कॅप्टन्सी सोडणार आहे. RCB च्या ट्विटर हँडलवर याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

RCB चा कॅप्टन म्हणून हे माझं शेवटचं पर्व असणार आहे. माझा अखेरचा आयपीएल सामना खेळेपर्यंत मी RCB मध्ये खेळाडू म्हणून कायम खेळत राहीन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि मला पाठींबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो अशा शब्दांत विराटने सर्वांचे आभार मानले आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये कोण असेल Virat Kohli चा उत्तराधिकारी? दोन खेळाडूंची नाव चर्चेत

हे वाचलं का?

आयपीएलमध्ये RCB च्या संघाचा कर्णधार म्हणून विराटची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. आपल्या नेतृत्वाखाली संघाला आयपीएलचं एकही विजेतेपद विराट मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळे यंदाचं आयपीएल ही कोहलीसाठी अखेरची संधी असणार आहे.

काही दिवसांपूर्वीच विराटने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. आगामी टी-२० विश्वचषकानंतर विराट फक्त वन-डे आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून काम पाहणार आहे. विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे नंतर चांगलेच पडसाद उमटताना दिसत आहेत. विराटने निवड समितीला रोहित शर्माला व्हाईस कॅप्टन्सी वरुन हटवत लोकेश राहुलला वन-डे संघासाठी आणि ऋषभ पंतला टी-२० संघासाठी उप-कर्णधारपद देण्याची मागणी केली होती. विराटच्या याच वागणुकीवर बीसीसीआय नाराज असल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

Virat-Rohit मधला अंतर्गत वाद कॅप्टन्सी सोडण्यासाठी कारणीभूत? कोहलीच्या ‘त्या’ मागणीवर BCCI नाराज

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT