IPL 2022 ला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद, टीव्ही व्ह्यूअरशीप ३३ टक्क्यांनी घसरली
२६ मार्चपासून आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदा १० संघांनिशी खेळवली जाणारी ही स्पर्धा प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी चर्चेचा विषय ठरली होती. परंतू स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात आयोजकांना चिंतेत टाकणारी एक बातमी समोर आली आहे. IPL च्या टीव्ही व्ह्युअरशीपमध्ये ३३ टक्क्यांनी घसरण झाल्याचं बोललं जातंय. टीव्हीवर सामने पाहणारे प्रेक्षक हा आयपीएलचा सर्वात मोठा फॅनबेस म्हणून […]
ADVERTISEMENT
२६ मार्चपासून आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदा १० संघांनिशी खेळवली जाणारी ही स्पर्धा प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी चर्चेचा विषय ठरली होती. परंतू स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात आयोजकांना चिंतेत टाकणारी एक बातमी समोर आली आहे. IPL च्या टीव्ही व्ह्युअरशीपमध्ये ३३ टक्क्यांनी घसरण झाल्याचं बोललं जातंय. टीव्हीवर सामने पाहणारे प्रेक्षक हा आयपीएलचा सर्वात मोठा फॅनबेस म्हणून ओळखला जातो.
ADVERTISEMENT
टीव्ही व्ह्यूवरशीप मॉनिटरिंग एजंसी BARC च्या आकडेवारीनुसार आयपीएलची व्ह्यूवरशीप पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ३.५७ मिलियनच्या जागी २.५२ मिलियन इतकी राहिली आहे.
यावर्षी हंगामातील चेन्नई आणि कोलकाता यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात आणि पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्याचा युझर्स बेस हा १०० मिलियनच्या पुढे गेला होता. परंतू आयपीएलची व्ह्यूअरशीप पहिल्या आठवड्यानंतर ३३ टक्क्यांनी घसरण्याची आतापर्यंतच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे.
हे वाचलं का?
दरम्यान, २०२३ ते २०२७ च्या आयपीएल हंगामासाठी बीसीसीआयने मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग राइट्ससाठी निवीदा मागवल्या आहेत. पुढील पाच वर्षांसाठी क्रिकेट बोर्ड या माध्यमातून अंदाजे ३३ हजार कोटी रुपये इतकी कमाई करेल असं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT