IPL 2022, SRH vs RR Live : हैदराबादचा निम्मा संघा गारद; राजस्थानची गोलंदाजीतही कमाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अवघ्या तीन धावांवर पहिला धक्का बसलेल्या हैदराबादचा डाव नंतर आलेल्या फलंदाजांना सावरता आला नाही. हैदराबादचा ३७ निम्मा संघ गारद झाला. युजवेंद्र चहलला षटकार मारण्याच्या प्रयत्नात समद बाद झाला. ११ षटकांअखेर हैदराबादची स्थिती ५ बाद ३९ अशी धावसंख्या आहे.

फिरकीपटू युजवेंद्र चहलने पहिल्या षटकात राजस्थान रॉयल्सला चौथं यश मिळवून दिलं. चहलला मोठा फटका मारण्याचा अभिषेक शर्माचा प्रयत्न फसला. खेळपट्टीवर जम बसवण्याच्या प्रयत्नात असलेल्या शर्माला चहलने माघारी पाठवले.

राजस्थानच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत दोनशे २१० पर्यंत मजल मारल्यानंतर गोलंदाजांनीही भेदक मारा केला. राजस्थानच्या जलदगती गोलंदाजांनी भेदक मारा केला. प्रसिद्ध कृष्णाने दोन, तर ट्रेंट बोल्टने एक गडी बाद केला. त्यामुळे हैदराबादची अवस्था सहा षटकात ३ बाद १४ अशी झाली आहे. बोल्टने निकोलस पूरनला पायचीत केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रसिद्ध कृष्णाचा भेदक मारा

जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने राजस्थान रॉयल्सला दुसरं यश मिळवून दिलं. प्रसिद्ध कृष्णाने डावाच्या दुसऱ्या षटकात कर्णधार विल्यमसनला बाद केल्यानंतर चौथ्या षटकात राहुल त्रिपाठीलाही तंबूचा रस्ता दाखवला. त्रिपाठी ३ धावा करून बाद झाला. ४ षटकांअखेर हैदराबादच्या २ बाद ७ धावा झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

कर्णधार विल्यमसन बाद

ADVERTISEMENT

राजस्थान दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबाद सनरायझर्सची सुरूवात चांगली झाली नाही. हैदराबादची धावसंख्या ३ असताना दुसऱ्याच षटकात कर्णधार केन विल्यमसन अवघ्या दोन धावा करून बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने विल्यमसनला झेलबाद केलं.

सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा हे दोन्ही सलामीवीर मैदानात उतरले आहेत.

हैदराबादसमोर २११ धावांचं आव्हान

सलामीवीरांनी केलेली चांगली सुरूवात, नंतर संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल यांच्यासह मधल्या फळीतील फलंदाजांनी अखेरच्या काही षटकात केलेल्या षटकार चौकारांची आतषबाजीवर राजस्थान रॉयल्सने दोनशेच्या पार धडक मारली. राजस्थानने २० षटकात ६ बाद २१० धावा केल्या. आता विजयासाठी सनरायझर्स हैदराबादसमोर २११ धावांचं आव्हान आहे.

देवदत्त आणि संजू बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या हेटमायर आणि परागने धावांची गती कायम ठेवली. मात्र १९व्या षटकात राजस्थानची धावसंख्या २०७ वर असताना नटराजनने हेटमायरला त्रिफळाचित केलं. हेटमायरने अवघ्या १३ चेंडूत ३२ धावांची झटपट खेळी केली.

राजस्थान दोनशे पार

जॉस बटलर आणि यशस्वी जायस्वालने चांगली सुरूवात करून दिल्यानंतर राजस्थानच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी याचा पुरेपुर फायदा घेतला. यशस्वी जायस्वालनंतर मैदानावर आलेल्या कर्णधार संजू सॅमसनने तडाखेबंद फलंदाजी करत अवघ्या २७ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. तर देवदत्त पडिक्कलनंही फटकेबाजी केली. मात्र, त्याला अर्धशतक पूर्ण करता आलं नाही.

सॅमसंन-देवदत्त परतले माघारी

कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त यांची फटकेबाजी सुरू असताना राजस्थानला लागोपाठ दोन धक्के बसले. १५व्या शतकात उमरान मलिकने देवदत्त पडिक्कलला त्रिफळाचित केलं. देवदत्तने ४१ धावा केल्या. देवदत्तनंतर १७व्या षटकात संजू सॅमसनही माघारी परतला. सॅमसनने तुफानी फटकेबाजी करत २७ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. सॅमसन बाद झाला तेव्हा राजस्थानची धावसंख्या १६३ वर पोहोचली होती.

राजस्थानाचं धावांचं शतक

राजस्थानने ११व्या षटकाअखेर दोन गडी बाद १०१ धावांपर्यंत मजल मारली आहे. जॉस बटलर बाद झाल्यानंतर सध्या संजू सॅमसन सोबत देवदत्त पडिक्कल खेळत आहे.

राजस्थानला दुसरा धक्का, बटलर बाद

सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स दुसरा धक्का दिला. राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरला उमरान मलिकने पव्हेलियनचा रस्ता दाखवला. मलिकने बटलरला झेलबाद केलं. निकोलस पूरनने बटलरलचा झेल घेतला. राजस्थानची धावसंख्या ९ षटकांअखेर दोन बाद ७८ वर पोहोचली आहे.

चांगल्या सुरूवातीनंतर राजस्थानला सातव्या षटकात झटका बसला. सलामीवीर यशस्वी जायस्वालला शेफर्डने झेलबाद केलं. यशस्वी यादवने राजस्थानच्या धावसंख्येत १६ चेंडूत २० धावाचं योगदान दिलं.

राजस्थानच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेचा पुरेपुर फायदा घेतला. पहिल्या षटकात एकच धाव करता आलेल्या दोन्ही फलंदाजांनी नंतरच्या पाच षटकात फटकेबाजी केली. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने ६ षटकात ५८ धावांपर्यंत मजल मारली.

पाचव्या षटकात राजस्थानच्या दोन्ही सलामीवीरांनी जबरदस्त फटकेबाजी केली. पाचव्या षटकात राजस्थानने १८ धावा वसुल केल्या.

अडखळत सुरूवात केलेल्या जॉस बटलरला दोनदा जीवदान. पहिल्या षटकानंतर चौथ्या षटकातही मिळालं जिवदान. राजस्थानच्या चार षटकाअखेर ३४ धावा.

हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने पहिले षटक टाकले. भुवनेश्वर कुमारने राजस्थान रॉयल्सला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. मात्र, भुवनेश्वरचा हा नो बॉल निघाल्याने सलामीवीर जॉस बटलरला जीवदान मिळालं.

IPL 2022 SRH vs RR : आज राजस्थान आणि हैदराबाद आमने-सामने; कोण देणार विजयी सलामी?

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या हंगामात रोमांचक सामने बघायला मिळत असून, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स सामना सुरू झाला आहे. दोन्ही संघांनी आयपीएलचे प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावलेलं असून, आज पुण्यातील एमसीए मैदानावर कोण बाजी मारणार याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT