IPL 2022 : Golden Duck वर आऊट झालेल्या कोहलीची सोशल मीडियावर उडवली जात आहे खिल्ली

मुंबई तक

RCB चा माजी कर्णधार विराट कोहलीचा ढासळलेला फॉर्म हा सध्या त्याच्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. विराटचा हा खराब फॉर्म हैदराबादविरुद्ध सामन्यातही कायम सुरु राहिला आहे. फाफ डु-प्लेसिससोबत सलामीला फलंदाजीसाठी आलेला विराट जगदीश सुचितच्या बॉलिंगवर एकही रन न घेता केन विल्यमसनच्या हाती सोपा कॅच देत माघारी परतला. यंदाच्या हंगामातलं विराट कोहलीचं हे तिसरं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

RCB चा माजी कर्णधार विराट कोहलीचा ढासळलेला फॉर्म हा सध्या त्याच्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. विराटचा हा खराब फॉर्म हैदराबादविरुद्ध सामन्यातही कायम सुरु राहिला आहे. फाफ डु-प्लेसिससोबत सलामीला फलंदाजीसाठी आलेला विराट जगदीश सुचितच्या बॉलिंगवर एकही रन न घेता केन विल्यमसनच्या हाती सोपा कॅच देत माघारी परतला.

यंदाच्या हंगामातलं विराट कोहलीचं हे तिसरं गोल्डन डक ठरलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यातली दोन गोल्डन डक ही विराटच्या नावावर हैदराबादविरुद्ध सामन्यातच जमा झाली आहेत. दरम्यान विराटच्या या निराशाजनक खेळानंतर सोशल मीडियावर फॅन्सनी त्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे. पाहूयात सोशल मीडियावर फॅन्सनी कशाप्रकारे मिम्स शेअर केली आहेत.

आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विराटने टीम इंडियाच्या कॅप्टन्सीपाठोपाठ RCB च्या कॅप्टन्सीचाही राजीनामा दिला. परंतू या गोष्टीचा त्याला फारसा फायदा होताना दिसत नाहीये.

फॅन्सच्या क्रिएटीव्हीटीला आलेला बहर हा दाद देण्यासारखा आहे. विविध मिम्सच्या माध्यमातून चाहते विराटला ट्रोल करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp