MS Dhoni चेन्नईत अखेरचा सामना खेळणार? IPL 2022 च्या हंगामातही खेळण्याचे दिले संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी आयपीएलला कधी रामराम करणार याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमी चर्चा असते. परंतू धोनी आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार असून त्याला चेन्नईच्या मैदानावर आपला अखेरचा सामना खेळायचा आहे. एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना धोनीने हे सूचक वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

आयपीएल २०२० मध्ये चेन्नईचा संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होऊ शकला नव्हता. यानंतर धोनीला तुझा हा शेवटचा आयपीएल हंगाम आहे का असा प्रश्न विचारला होता, ज्याला त्याने नक्कीच नाही (Definitely not) असं उत्तर दिलं होतं.

“जर माझ्या निरोपाचा सामना म्हणत असाल तर तुम्ही मला चेन्नईकडून खेळताना पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला मला निरोप देण्याची संधी मिळणार आहे. मला आशा आहे की चेन्नईत आपण फॅन्सच्या उपस्थितीत माझा शेवटचा सामना खेळू”, महेंद्रसिंह धोनी इंडियन सिमेंट कंपनीच्या ७५ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमीत्त बोलत होता. चेन्नई सुपरकिंग्ज या संघाची मालकी इंडियन सिमेंट कंपनीकडे आहे.

हे वाचलं का?

त्यामुळे यंदाच्या हंगामात धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IPL 2021 : बाबांची मॅच सुरु असताना लाडकी झिवा करत होती देवाकडे प्रार्थना, क्यूट फोटो व्हायरल

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT