मॅनेजरच्या परवानगीनंतरच मौलवी ड्रेसिंग रुममध्ये आले !
संघात मुसलमान खेळाडूंना प्राधान्य देत असल्याच्या आरोपावरुन टीम इंडियाचा माजी ओपनर आणि मुंबईकर वासिम जाफरने उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव महिम वर्मा यांनी जाफरवर हा आरोप केला होता. उत्तराखंड संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये नमाज पठन करण्यासाठी मौलवी आल्यामुळे बायो बबल मोडण्यात आल्याचा ठपकाही जाफरवर ठेवण्यात आला. परंतू संघाच्या मॅनेजरने परवानगी दिल्यानंतरच ड्रेसिंग रुममध्ये […]
ADVERTISEMENT
संघात मुसलमान खेळाडूंना प्राधान्य देत असल्याच्या आरोपावरुन टीम इंडियाचा माजी ओपनर आणि मुंबईकर वासिम जाफरने उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव महिम वर्मा यांनी जाफरवर हा आरोप केला होता. उत्तराखंड संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये नमाज पठन करण्यासाठी मौलवी आल्यामुळे बायो बबल मोडण्यात आल्याचा ठपकाही जाफरवर ठेवण्यात आला. परंतू संघाच्या मॅनेजरने परवानगी दिल्यानंतरच ड्रेसिंग रुममध्ये मौलवी आल्याचं स्पष्टीकरण स्पिनर इक्बाल अब्दुल्लाने दिलं.
ADVERTISEMENT
“आम्ही शुक्रवारचा नमाज मौलवींशिवाय पढत नाही. दुपारी साडेतीन नंतर आमची प्रॅक्टीस संपली की तेव्हाच आम्ही नमाज पठनाला जातो. मी सर्वात आधी वासिम भाईंना विचारलं की नमाजसाठी मौलवींना बोलावता येईल का?? तेव्हा त्यांनी मला टीमच्या मॅनेजरची परवानगी घ्यायला सांगितली. यानंतर मी आमचे मॅनेजर नवनीत मिश्रा यांच्याशी बोललो त्यावेळी त्यांनी मला परवानगी देत, काहीच प्रॉब्लेम नाही इक्बाल, प्रार्थना आणि धर्म पहिले असं म्हटलं. मॅनेजरने दिलेल्या परवानगीनंतरच मी मौलवींना बोलावलं.” इक्बाल इंडियन एक्सप्रेसशी बोलत होता.
उत्तराखंड क्रिकेट असोसिएशननेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून टीमचे मॅनेजर नवनीत मिश्रा यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे. मौलवी ड्रेसिंग रुममध्ये आल्यामुळे बायो बबल मोडण्यात आल्याच्या आरोपावर इक्बाल अब्दुल्लाने जर मला मॅनेजरने मौलवींना बोलवता येणार नाही असं सांगितलं असतं तर मी त्यांना बोलवलंच नसतं. ड्रेसिंग रुममध्ये मौलवी दोनवेळा आले होते असं स्पष्टीकरण दिलं. वासिम जाफरसारख्या खेळाडूवर अशा पद्धतीने आरोप होणं दुर्दैवी असल्याचंही इक्बाल म्हणाला.
हे वाचलं का?
वासिम भाईंनी कधीच खेळामध्ये धर्म येऊ दिला नाही. त्यांनी नेहमी संघाचा विचार पहिल्यांदा केला आहे. कोणत्याही क्रिकेटरला आपल्यावर असे आरोप झाले तर वाईटच वाटेल. मी त्यांच्याशी बोललो….या आरोपांमुळे ते दुखावले गेले आहेत. खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचंही इक्बाल म्हणाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT