विराट कोहलीला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आलीये का?
गेली १० वर्ष जागतीक क्रिकेटवरती आपल्या फलंदाजीने अधिराज्य गाजवणाऱ्या आणि भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) किंग कोहली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटच्या आयुष्यात मागच्या तीन वर्षांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. मागच्या तीन वर्षातील विराट कोहलीच्या (Virat Kohli) कहाणीवरती नजर टाकली तर ती मावळणाऱ्या सुर्यासारखी आहे. जो विराट कोहली शतकांमागून शतकं करत होता त्याला गेल्या तीन वर्षांपासून मोठी […]
ADVERTISEMENT

गेली १० वर्ष जागतीक क्रिकेटवरती आपल्या फलंदाजीने अधिराज्य गाजवणाऱ्या आणि भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) किंग कोहली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटच्या आयुष्यात मागच्या तीन वर्षांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. मागच्या तीन वर्षातील विराट कोहलीच्या (Virat Kohli) कहाणीवरती नजर टाकली तर ती मावळणाऱ्या सुर्यासारखी आहे. जो विराट कोहली शतकांमागून शतकं करत होता त्याला गेल्या तीन वर्षांपासून मोठी धावसंख्या करण्यासाठी झगडावं लागत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळला जात आहे. गेल्या वर्षी जेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडत होता, तेव्हा भारताने इंग्लंडचा दौरा केला होता. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चार सामन्यांसह भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आणि इतिहास घडवला.
टीम इंडियाच्या विजयी रथावर कोरोनाने (Corona) लगाम घातला आणि सामना एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला. आता जेव्हा कसोटी एजबॅस्टनमध्ये होत आहे, त्याआधी विराट कोहलीचे चाहते पूर्ण जोमात होते. 2018 च्या इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीचा जो धडाकेबाज फॉर्म पाहायला मिळाला होता, तोच फॉर्म इथेही पाहायला मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण तसे झाले नाही, एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात 11 धावा आणि दुसऱ्या डावात 20 धावा करणाऱ्या विराट कोहलीने सर्व आशा धुडकावून लावल्या.
विराट कोहलीचा हा बॅड पॅच बराच काळ सुरू आहे, तीन वर्षांपासून एकही शतक विराटने केलेले नाही. पण आता समस्या शतकाची नाही, तर समस्या आहे ती मोठ्या खेळीची. अशा परिस्थितीत विराट कोहलीला प्लेइंग-11 मध्ये ठेवावे का? असा प्रश्न विचारला जात आहे.