बाबांच्या आठवणीत भावूक झाला कृणाल, मैदानात फुटला अश्रूंचा बांध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टीम इंडियाकडून पहिला वन-डे सामना खेळणाऱ्या कृणाल पांड्याने आपली चमक दाखवत नॉटआऊट ५८ रन्सची इनिंग खेळली. याआधी भारतीय संघाचं टी-२० क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व केलेल्या कृणालला वन-डे आणि टेस्ट टीममध्ये स्थान मिळालं नव्हतं. परंतू इंग्लंडविरूद्ध दौऱ्यासाठी त्याची संघात निवड झाली. पहिल्याच वन-डे सामन्यात कृणालला भारतीय संघात संधी देण्यात आलं आणि आपल्याला मिळालेल्या या संधीचं सोनं करण्यात कृणालही यशस्वी ठरला. काही दिवसांपूर्वीच कृणालच्या वडिलांचं निधन झालं.

ADVERTISEMENT

आपलं पहिलं अर्धशतक वडिलांना समर्पित करत असताना कृणालच्या अश्रुंचा बांध फुटला आणि तो मैदानातच रडू लागला. यानंतर कृणालचा इंटरव्ह्यूही रद्द करण्यात आला. यानंतर भावूक झालेल्या आपल्या भावाला मिठी मारत हार्दिक पांड्याने त्याचं सांत्वन केलं.

सातव्या क्रमांकावर बॅटींगसाठी आलेल्या कृणाल पांड्याने इंग्लंडच्या बॉलिंग लाईनअपचा चांगलाच समाचार घेतला. ३१ बॉलमध्ये ७ फोर आणि २ सिक्स लगावत कृणालने ५८ रन्सची इनिंग खेळली. याव्यतिरीक्त शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल यांनीही हाफ सेंच्युरी करत संघाची बाजू वरचढ करण्यात मोलाची भूमिका बजावली.

हे वाचलं का?

Ind vs Eng : पहिल्याच वन-डे मॅचमध्ये कृणालची हाफ सेंच्युरी, दिग्गज प्लेअर्सच्या पंगतीत स्थान

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT