IPL 2022: आयुष्य संपलेलं नाही, पुन्हा सुर्योदय होईल ! सहा पराभवांनंतर बुमराहचा आशावाद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वोत्तम संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम अतिशय निराशाजनक झाला आहे. आतापर्यंत झालेल्या सहाही सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. शनिवारी लखनऊ सुपरजाएंट संघाविरुद्ध सामन्यातही मुंबईला 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

ADVERTISEMENT

यंदाच्या हंगामात मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने आजमावलेल्या रणनितीवर अनेक चाहते नाराज होते. संघातील चांगल्या खेळाडूंना रिलीज करत मुंबईने इशान किशन, जोफ्रा आर्चर यासारख्या खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च केले. तसेच यंदाच्या हंगामातही एकही चांगला बॉलर मुंबईला खरेदी करता आला नाही. परिणामी यंदाच्या हंगामात मुंबईला सलग सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. परंतू असं असतानाही मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी करण्याचा आशावाद व्यक्त केला आहे.

MI vs LSG : मुंबई इंडियन्स ‘प्ले ऑफ’मधून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर

हे वाचलं का?

“माझ्या मते आयुष्य इथे संपून जात नाही, सुर्योदय होणार आहे. क्रिकेट हा खेळ आहे, कोणीतरी जिंकणार आहे आणि कोणीतरी हरणार आहे. आम्ही आयुष्य गमावून बसलेलो नाहीयोत आणि क्रिकेटचा खेळ हरलो आहे.” लखनऊविरुद्ध सामना गमावल्यानंतर जसप्रीत बुमराह बोलत होता. आमच्याइतके निराश कोणीही नसेल. आम्ही कमी पडतोय हे सांगायला मला काहीच लाज वाटत नाही परंतू उरलेल्या सामन्यांमध्ये आम्ही संपूर्ण प्रयत्न करुन कमबॅक करु असा आशावाद बुमराहने व्यक्त केला.

Rohit Sharma : ‘मी पूर्ण जबाबदारी घेतो’; मुंबईच्या पराभवाच्या मालिकेमुळे रोहित निराश

ADVERTISEMENT

जसप्रीत बुमराहला यंदा बॉलिंगमध्ये म्हणाला तसा सपोर्ट मिळाला नाही. कर्णधार रोहित शर्मानेही संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्विकारली आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये मुंबईचा संघ कशा पद्धतीने पुनरागमन करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT