Ranji Trophy: मध्य प्रदेशने रचला इतिहास, पहिल्यांदाच जिंकली ‘रणजी ट्रॉफी’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मध्य प्रदेशच्या संघाने यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी करत रणजी करंडक 2021-22 (Ranji trophy 2021-22) चे विजेतेपद पटकावले आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईचा सहा विकेट्स राखून पराभव केला. मध्य प्रदेशने प्रथमच रणजी करंडक जिंकला आहे. याआधी एमीच्या संघाने 1999 मध्ये चंद्रकात पंडितच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरी गाठली होती, जिथे त्यांचा कर्नाटककडून 96 धावांनी पराभव झाला होता. तेच चंद्रकात पंडित सध्या मध्य प्रदेशच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. (Madhya pradesh won ranji trophy)

108 धावांचे माफक लक्ष्य

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रातच मुंबईने आपल्या उर्वरित आठ विकेट गमावल्या, त्यामुळे मुंबईचा दुसरा डाव 269 धावांवर आटोपला. मुंबईसाठी दुसऱ्या डावात सुवेद पारकरने 51 धावा केल्या. त्याचवेळी संघाकडून सरफराजने 45 आणि कर्णधार पृथ्वी शॉने 44 धावा केल्या. मध्य प्रदेशकडून कुमार कार्तिकेयने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एमीच्या संघाने 108 धावांचे लक्ष्य सहज गाठले. एमपीसाठी दुसऱ्या डावात हिमांशू मंत्रीने सर्वाधिक 37 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी 30-30 धावांची खेळी केली.

मुंबईने पहिल्या डावात केल्या 374 धावा

ADVERTISEMENT

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 374 धावा केल्या. सरफराज खानने शानदार फलंदाजी करताना 134 धावांची खेळी केली. याशिवाय यशस्वी जैस्वालने 78 आणि पृथ्वी शॉने 47 धावांचे योगदान दिले. मध्य प्रदेशच्यावतीने गौरव यादवला चार आणि अनुभव अग्रवालला तीन बळी मिळाले.

ADVERTISEMENT

मध्य प्रदेशच्या संघाला 162 धावांची आघाडी

374 धावांच्या प्रत्युत्तरात मध्य प्रदेशचा पहिला डाव 536 धावांत आटोपला. रजत पाटीदार, शुभम शर्मा आणि यश दुबे यांनी या चमकदार कामगिरीमध्ये उत्कृष्ट योगदान दिले, ज्यांनी शतके झळकावली. रजत पाटीदारने 122 धावांची शानदार खेळी खेळली, ज्यात 20 चौकारांचा समावेश होता. दुसरीकडे, यश दुबेने 133 आणि शुभम शर्माने 116 धावा केल्या. मुंबईकडून शम्स मुलानीने सर्वाधिक 5 बळी घेतले.

रणजी ट्रॉफीचे शेवटचे पाच विजेते

2021-22 मध्य प्रदेश

2019-20 सौराष्ट्र

2018-19 विदर्भ

2017-18 विदर्भ

2016-17 गुजरात

मुंबई सर्वाधिक 41 वेळा चॅम्पियन

87 वर्षांत रणजी ट्रॉफीच्या इतिहासात मध्य प्रदेशचा संघ फक्त दुसरा अंतिम सामना खेळत होता. तर मुंबईचा संघ सर्वाधिक 41 वेळा विजयी झाले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात मध्य प्रदेशने बंगालचा 174 धावांनी पराभव केला. दुसरीकडे पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने उत्तर प्रदेशवर विजय मिळवला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT