Video: 6,0,6,6,6,4...IPL च्या सर्वात महागड्या गोलंदाजाला धू धू धुतलं! कोण आहे 'तो' धडाकेबाज फलंदाज?
Liam Livingstone vs Mitchell Starc Video Viral : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानात चौथा एकदिवसीय सामना शुक्रवारी रंगला. यावेळी इंग्लंडच्या फलंदाजांनी कांगारु गोलंदाजांचा धुव्वा उडवला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लियाम लिविंगस्टोनने मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला
आयपीएलच्या सर्वात महागड्या गोलंदाजाने नोंदवला लाजिरवाणा विक्रम
लियाम लिविंगस्टोनची धडाकेबाज फलंदाजी पाहून तुमच्याही भुवया उंचावतील
Liam Livingstone vs Mitchell Starc Video Viral : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानात चौथा एकदिवसीय सामना शुक्रवारी रंगला. यावेळी इंग्लंडच्या फलंदाजांनी कांगारु गोलंदाजांचा धुव्वा उडवला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 39 षटकांच्या सामन्यात 5 विकेट्स गमावून 312 धावांचा डोंगर रचला. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची दाणादाण उडाली.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला अवघ्या 124 धावांवर गारद केलं. पण या सामन्यात एक जबरदस्त टर्निंग पॉईंट पाहायला मिळाला. इंल्गंडचा धडाकेबाज फलंदाज लियाम लिविंगस्टोनने फक्त 27 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीनं नाबाद 62 धावांची खेळी केली. लियामने आयपीएलच्या सर्वात महागडा गोलंदाज मिचेल स्टार्कच्या शेवटच्या षटाकत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.
मिचेल स्टार्कने नोंदवला लाजीरवाणा विक्रम, पाहा व्हिडीओ
इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टोनने ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला धू धू धुतलं. लियामने स्टार्कच्या एकाच षटकात चार षटकार ठोकून सर्वांनाच थक्क केलं. लियामने तिसरा षटकार ठोकून इंग्लंडला 300 धावांपर्यंत पोहोचवलं. या षटकातील दुसरा चेंडू वगळता लियामने सर्व चेंडूंवर मोठे फटके मारले. मिचेल स्टार्कने फेकलेल्या या शेवटच्या षटकात लियामने 28 धावा कुटल्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने एकाच षटकात सर्वात जास्त धावा दिल्याची नोंद क्रिकेटच्या इतिहासात झाली आहे. स्टार्कच्या या लाजिरवण्या विक्रमाचा भारतीय चाहत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. लियाम आणि स्टार्कच्या 'रन'धुमाळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मिचेल स्टार्क आणि लियाम लिविंगस्टोनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मिम्सचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत स्टार्कची खिल्ली उडवली असून लियामचं भरभरून कौतुक केलं आहे. मिचेल स्टार्कने 8 षटकात 70 धावा दिल्या. आयपीएलच्या या सर्वात महागड्या गोलंदाजाला या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT