Ms Dhoni : ‘माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा’, धोनीने दिले निवृत्तीचे संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

ms dhoni retirement speculations
ms dhoni retirement speculations
social share
google news

Ms Dhoni IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये दररोज एका पेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहे. या सामन्यामुळे आयपीएलची रंगत आणखीण वाढत आहे. असे सर्व असताना आता चेन्नईच्या फॅन्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super King) कर्णधार एमएस धोनी (Ms Dhoni)आयपीएलमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत त्याने हैद्राबाद विरूद्धच्या विजयानंतर दिले आहेत. हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा असल्याचे विधान धोनीने केले होते.या विधानानंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. (ms dhoni retirement speculations last phase of my careee csk vs srh)

सनरायजर्स हैद्राबादचा (Sunrisers Hyderabad) 7 विकेटने पराभव केल्यानंतर धोनीने बातचीत केली होती. यावेळी धोनी म्हणाला की, हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा आहे. या मैदानावर खेळायला चांगले वाटते. फॅन्सचे खुप प्रेम मिळते, असा धोनी म्हणाला आहे. तो पुढे म्हणतो, आयपीएलमध्ये बॅटींगची फारशी संधी मिळाली नाही, पण अशी काय माझी तक्रार नाही आहे. या मैदानावर प्रथम फिल्डीगचा संकोच वाटत होता, कारण मला वाटले की जास्त दव पडणार नाही. आमच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली, आणि वेगवान गोलंदाज पाथिरानाने सुद्धा, असे तो म्हणाला.

सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार एडन मार्करमने पराभावाचे खापर फलंदाजांवर फोडले. मला पराभव कधीच आवडत नाही.पण फलंदाजांनी निराशा केली. आम्ही चांगली पार्टनरशीप करू शकलो नाही, अशी खंत देखील त्याने व्यक्त केली. या विकेटवर 130 चा स्कोर हा फार काही चांगला नव्हता, आम्हाला 160 धावा केल्या पाहिजे होत्या,असे तो म्हणाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

असा रंगला सामना

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या सनराइजर्स हैदराबादने 7 विकेट गमावून 134 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या चेन्नईन् 8 बॉल शिल्लक ठेवून 3 विकेट गमावून 138 धावा केल्या. यामध्ये डेवोन कॉन्वेने 57 बॉलमध्ये नाबाद 77 धावा केल्या. अशाप्रकारे चेन्नईने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेटने पराभव केला. या विजयानंतर चेन्नईचे टीम पॉईट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

पॉईट्स टेबलमध्ये काय?

चेन्नई सुपर किंग्जच्या हैदराबाद विरूद्धच्या विजयानंतर पॉईट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. राजस्थान रॉयल्स 6 सामन्यात 8 पॉईट्ससह पहिल्या स्थानी आहे. तर लखनऊ सुपर जाएंट्स 6 सामन्यात 8 पॉईट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तर तिसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्ज आहे. चेन्नई 6 सामन्यात 8 पॉईट्ससह तिसऱ्या स्थानी आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT