IPL 2022 : अर्जुन तेंडुलकर पुन्हा मुंबई इंडियन्सकडेच, पण ‘त्या’ संघामुळे भाव वाढला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनचा दुसरा दिवस गाजवला तो मुंबई इंडियन्सने. अनेक खेळाडूंसाठी मुंबईने दुसऱ्या दिवशी मोठी रक्कम मोजली. अखेरच्या टप्प्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं नाव ऑक्शनसाठी आलं. यावेळी मुंबईने अर्जुनला आपल्या संघात कायम राखण्यात यश मिळवलं आहे. परंतू यादरम्यान एक मजेशीर प्रसंग पहायला मिळाला.

ADVERTISEMENT

अर्जुन तेंडुलकरची बेस प्राईज ही २० लाख रुपये होती. ऑक्शनर एडमीस यांनी अर्जुनचं नाव घेतल्यानंतर मुंबईने लगेच आपली बोली लावली. परंतू यानंतर गुजरात टायटन्सनेही अर्जुनसाठी रस दाखवत २५ लाखांची बोली लावली. ज्यानंतर मुंबईने अर्जुनसाठी ३० लाख मोजायची तयारी दाखवली. यावेळी मुंबईच्या संघाचे मालक आकाश अंबानी गुजरातच्या ऑक्शन टेबलकडे पाहून हसताना पहायला मिळाले.

कल्याणचा तुषार देशपांडे आयपीएलमध्ये धोनीसोबत खेळणार, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

हे वाचलं का?

अखेरीस अर्जुन मुंबईच्याच संघात कायम राहिला असला तरीही काही क्षणांसाठी गुजरातने दाखवलेल्या इच्छेमुळे अर्जुनला १० लाखांची रक्कम वाढवून मिळाली आहे. अर्जुन तेंडुलकर २०२१ च्या आयपीएल हंगामात सहभागी झाला होता. परंतू दुर्दैवाने दुबईत स्पर्धेदरम्यान दुखापतीमुळे त्याला माघारी यावं लागलं होतं.

IPL 2022 : यंदाच्या स्पर्धेत सहभागी होणार नाही तरीही मुंबईने ‘या’ खेळाडूसाठी मोजले ८ कोटी

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT