ind vs nz : भारतविरूद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसाचा खेळ, तरीही ‘सुर्या’ने मारलं मैदान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी होणारा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना संततधार पावसामुळे रद्द करावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा संघ १-० ने आघाडीवर आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी, ३० नोव्हेंबर रोजी क्राइस्टचर्च येथे होणार आहे.

ADVERTISEMENT

सिरीज जिंकण्याच्या आशेवर पाणी

भारत आता तीन सामन्यांची मालिका जिंकू शकत नाही पण अंतिम एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. रविवारी पाऊस पडला किंवा मैदान ओलेच राहिले, यामुळे सामना दोनदा सुरू होऊनही केवळ 12.5 षटकांचा खेळ होऊ शकला, ज्यामध्ये भारताने एका विकेटवर 89 धावा केल्या. पावसामुळे दुसऱ्यांदा सामना थांबवण्यात आल्याने पुन्हा सुरू होऊ शकला नाही. यावेळी सलामीवीर शुभमन गिल 42 चेंडूत चार चौकार आणि एक षटकारासह 45 धावांवर खेळत होता, तर सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 34 धावा करत त्याला साथ दिली.

पावसामुळे दोनदा सामना थांबवावा लागला

पावसामुळे टॉसला सुमारे 15 मिनिटे उशीर झाला पण सामना वेळेवर सुरू झाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिल आणि कर्णधार शिखर धवन (03) या सलामीच्या जोडीने 4.5 षटकात विकेट न गमावता 22 धावा केल्या, तेव्हा पाऊस पडला आणि खेळ जवळपास चार तास थांबला. खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा सामना 29 षटकांचा करण्यात आला. खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा भारताने दुसऱ्या चेंडूवर धवनची विकेट गमावली, ज्याने मॅट हेन्रीचा चेंडू थेट मिड-ऑनला लॉकी फर्ग्युसनच्या हातात दिला. गिलने सुरुवातीलाच हेन्रीला षटकार खेचला. तर सुर्यकुमार यादवने देखील तुफान फटकेबाजी केली.

हे वाचलं का?

सामना रद्द करण्यात आला

यानंतर पावसामुळे खेळ पुन्हा थांबवावा लागला, जो पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि अखेर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने दोन बदल करत शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला, तर दीपक हुडाला संजू सॅमसनच्या जागी संघात स्थान दिले. न्यूझीलंडनेही एक बदल केला आणि अॅडम मिल्नेच्या जागी मायकेल ब्रेसवेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला.

छोट्याशा सामन्यातही वर्चस्व गाजवणारा सूर्या

सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये तो आपली जादू पसरवू शकला नसला, परंतु जेव्हा पावसामुळे षटके कमी झाली आणि सूर्याला नंबर-3 वर पाठवण्यात आले, तेव्हा त्याने आपले अप्रतिम खेळ दाखवून दिले. सूर्यकुमारने 25 चेंडूत 34 धावांची खेळी खेळली, ज्यात 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. सूर्याचा एकदिवसीय विक्रम पाहिला तर त्याने 15 सामन्यात 378 धावा केल्या आहेत, त्याची सरासरी 35 च्या आसपास आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT