PAK vs ENG, T20 World Cup Final : बेन स्टोक्सचा पाकिस्तानला तडाखा, इंग्लंड T20 चा विश्वविजेता!

मुंबई तक

क्रिकेट रसिकांना टी-२० विश्वचषकांच्या अंतिम सामन्यात रोमहर्षक लढत बघायला मिळाली. मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी कमाल केली. मात्र, बेन स्टोक्सच्या निर्णायक आणि तडाखेबंद खेळीनं १९९२ च्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचं पाकिस्तानचं स्वप्न भंगलं. सामना पाकिस्तानच्या बाजून झुकलेला असताना अफलातून खेळी करत बेन स्टोक्सने इंग्लंडचं विश्वविजेतेपद जिंकण्याचं स्वप्न साकार केलं. पाकिस्तानला नमवत अखेर इंग्लंड टी२० […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

क्रिकेट रसिकांना टी-२० विश्वचषकांच्या अंतिम सामन्यात रोमहर्षक लढत बघायला मिळाली. मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी कमाल केली. मात्र, बेन स्टोक्सच्या निर्णायक आणि तडाखेबंद खेळीनं १९९२ च्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचं पाकिस्तानचं स्वप्न भंगलं. सामना पाकिस्तानच्या बाजून झुकलेला असताना अफलातून खेळी करत बेन स्टोक्सने इंग्लंडचं विश्वविजेतेपद जिंकण्याचं स्वप्न साकार केलं.

पाकिस्तानला नमवत अखेर इंग्लंड टी२० क्रिकेटचा विश्वविजेता बनला. मेलबर्नच्या मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात १९९२च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. मात्र, इंग्लंडने पाकिस्तानला ५ गडी राखून पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरलं.

२०२२ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकत इंग्लंड दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केलीये. यापूर्वी इंग्लंडने २०१० मध्ये टी२० विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर एकाच वेळी एकदिवसीय आणि टी२० विश्वचषक स्वतःकडे ठेवण्याची कामगिरीही इंग्लंडने केलीये.

इंग्लंडकडून सॅम करनने भेदक मारा करत पाकिस्तानला मोठं लक्ष्य गाठण्यापासून रोखल. करनने तीन गडी बाद केले. दुसरीकडे बेन स्टोक्सने पाच चौकार आणि एका षटकारासह महत्त्वपूर्ण अर्धशतकीय खेळी साकारली.

हे वाचलं का?

    follow whatsapp