Neeraj Chopra: 'खेल अभी बाकी है!' भारताच्या खात्यात 'रौप्य'; भालाफेकीत नीरज चोप्राचा मोठा पराक्रम!
Paris Olympics 2024 Neeraj Chopra : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील 5वे पदक मिळवून दिले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत 89.45 मीटर थ्रो करत रौप्य पदक मिळवले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिसमधील ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवले आहे.
रौप्यपदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राने आपल्या भावना व्यक्त केल्या.
नीरज चोप्राच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले आहे.
Paris Olympics 2024 Neeraj Chopra won silver Medal : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील 5वे पदक मिळवून दिले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत 89.45 मीटर थ्रो करत रौप्य पदक मिळवले. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले रौप्य पदक ठरले. नीरज चोप्राचे अंतिम फेरीत पाचपैकी 4 थ्रो फाऊल गेले. पण त्याने दुसऱ्याच थ्रोमध्ये 89 मीटरचा टप्पा गाठला. तर अर्शद नदीम वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही. पाकिस्तानचा अर्शद नदीम प्रथम तर भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी आला आहे. तर तिसरा क्रमांक ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 88.54 मीटरसह मिळवला. (paris olympics 2024 neeraj chopra javelin throw final result won silver medal)
नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक-2024 मध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. गुरुवारी (8 ऑगस्ट) रात्री झालेल्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरजने दुसरे स्थान पटकावले. नीरजने टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
हेही वाचा : Ajit Pawar Exclusive: '...त्यावेळी चूक झाली तर पवार साहेब सावरून घ्यायचे', अजितदादांची बेधडक मुलाखत
पॅरिसमध्येही त्याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती, मात्र तसं न घडता त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नदीमने ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. नीरजने 89.45 मीटर भालाफेक करून रौप्यपदकाचा मान मिळवला.
नीरज हा दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी सुशील कुमार, पीव्ही सिंधू आणि मनू भाकर यांनी हे काम केले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तो भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देईल, अशी नीरजकडून साऱ्या देशाला अपेक्षा होती, पण सर्वतोपरी प्रयत्न करूनही तो त्यात अपयशी ठरला.










