Asian Games 2023: शिंदे-फडणवीसांनीही कौतुक केलेली पारुल चौधरी आहे तरी कोण?
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रथम स्थान पटकावून पारुल चौधरीने चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तिचे अभिनंदन केले आहे.
ADVERTISEMENT

Asian Games: पारुल चौधरी (Parul Chaudhary) या एका शेतकऱ्याची मुलीने मंगळवारी भारतासाठी दुसरे सुवर्णपदक (gold medal) जिंकत नवा इतिहास रचला आहे. तिच्या या सुवर्ण पदकाने भारतीयांची मान मात्र उंचावली आहे. त्यामुळे भारतातील सगळा सोशल मीडिया आता तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. मेरठची ॲथलीट (athlete) कन्या पारुल चौधरी आपल्या चमकदार कामगिरीमुळे ती सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्रॅक आणि फील्ड (Track and Field) स्पर्धेतील तिच्या सुवर्णपदक कामगिरीने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची दाद
मंगळवारी पारुलने 5000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी सोमवारी पारुलने 3000 मीटरमध्येही रौप्यपदक पटकावले होते. तिच्या या यशानंतर सोशल मीडियावर तिचे कौतुक होत असले तरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोशल मीडियावरुन तिचे अभिनंदन करत तिच्या प्रयत्नामुळे भारताची मान उंचावली असून जगात चमकला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा >> Aaditya Thackeray लोकसभा निवडणूक लढवणार?, India Today Conclave मध्ये सांगितला प्लॅन
पारुलने चकित केले
पारुल चौधरीने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रथम स्थान पटकावून तिने चमकदार कामगिरी केली आहे. तिच्यामुळे आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताला 14 वे सुवर्णपदक मिळाले आहे. तिने काल संध्याकाळी महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक पटकावले होते, परंतु यावेळी तिने शेवटच्या काही मीटरमध्ये वेग वाढवून प्रतिस्पर्धकालाही चकित केले आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
छोट्या गावातून मोठी कामगिरी
मेरठमध्ये राहणाऱ्या कृष्णपाल सिंग यांची पारुल चौधरी ही मुलगी. शेतकरी कुटुंबीत वाढली असली तरी तिने भारतासाठी केलेली सुवर्ण कामगिरी ही चमकदार राहिली आहे. पारुलने सुवर्णपदक मिळवताच मेरठ आनंदात न्हाऊन निघाले. अनेक लोकांनी जोरदार जल्लोष साजरा केला. काल तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे तिचे घर लोकांनी भरुन गेले होते. यावेळी साऱ्या गावाने मिठाई वाटून आनंद साजरा केला.