T-20 World Cup : पाकिस्तान वठणीवर, अधिकृत जर्सीवर लिहीलं भारताचं नाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आगामी टी-२० विश्वचषकात २४ ऑक्टोबरला बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार आहे. या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याचा ज्वर चढलेला दिसतो आहे. पाकिस्ताननेही आपल्या जुन्या सवयीप्रमाणे भारताची खोड काढायला सुरुवात केली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पाकिस्तानच्या संघाच्या जर्सीवर भारताऐवजी युएईचं नाव लिहीण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

परंतू पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली चूक सुधारत संघासाठीची नवी जर्सी लाँच केली आहे, ज्यात भारताचं नाव देण्यात आलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नव्या जर्सीचा लूक जाहीर केला आहे.

Ind vs Pak : पटाखे तो फुटने से रहें…मौका मौका वाला ‘तो’ परतलाय, व्हिडीओ पाहिलात का?

हे वाचलं का?

यंदाच्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन हे युएईत होणार असलं तरीही या स्पर्धेचं यजमानपद हे बीसीसीआयकडे आहे. भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि दोन्ही देशांमधले बिघडलेले राजकीय संबंध यामुळे यंदाची स्पर्धा ही युएईत भरवण्यात आली. पाकिस्ताननेही आगळीक करत सुरुवातीला भारताचं नाव लिहीण्याऐवजी युएई असं नाव आपल्या जर्सीवर लिहीलं होतं. परंतू ही चूक आता सुधारण्यात आली आहे.

T-20 World Cup : पहिल्याच सामन्यात बांगलादेशला धक्का, स्कॉटलंडची ६ धावांनी सरशी

ADVERTISEMENT

या विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतासह दुसऱ्या गटामध्ये आहे. या गटात भारताशिवाय अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ देखील सहभागी आहेत. पाकिस्तानने २००९ मध्ये टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली, तर २००७ मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.

ADVERTISEMENT

T-20 World Cup : तो आला आणि कामालाही लागला, मेंटॉर धोनीला नव्या रुपात पाहिलंत का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT