निसटलेला डाव सावरण्यासाठी मुंबईचा शेवटचा प्रयत्न, ‘या’ बॉलरला संघात संधी मिळण्याचे संकेत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाच वेळा आयपीएल हंगामाचं विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातली कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. सलग सहा सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचं यंदाच्या हंगामात प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे. यंदाच्या हंगामात ऑक्शनपासून मुंबई इंडियन्सची रणनिती चुकत गेल्याची खंत सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहते आणि माजी खेळाडूंनी बोलून दाखवली.

ADVERTISEMENT

अशा परिस्थितीत आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने हातातून निसटत चाललेला डाव सावरण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णीला यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्समध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

सलग सहा पराभवांनंतर मुंबईचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर फेकला गेला आहे. यापुढील सामन्यांमध्ये मुंबईचा दोन सामन्यांत झालेला पराभव त्यांचं यंदाच्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आणू शकतो. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सने अनुभवी गोलंदाज म्हणून धवलला संधी देण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

Rohit Sharma : ‘मी पूर्ण जबाबदारी घेतो’; मुंबईच्या पराभवाच्या मालिकेमुळे रोहित निराश

ADVERTISEMENT

यंदाच्या हंगामात जसप्रीत बुमराहला साथ देईल असा एकही तोलामोलाचा खेळाडू मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नाहीये. धवल कुलकर्णीकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. त्याच्या खात्यात 92 सामन्यांमध्ये 86 विकेट जमा आहेत. धवलने आतापर्यंत मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स या संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. 2020 मध्ये मुंबईने 75 लाखांच्या बोलीवर धवलला संघात घेतलं होतं. यानंतर 2021 च्या हंगामासाठीही मुंबईने धवलला कायम राखलं. परंतू मागच्या हंगामात धवल फक्त एक सामना खेळू शकला.

ADVERTISEMENT

IPL 2022: आयुष्य संपलेलं नाही, पुन्हा सुर्योदय होईल ! सहा पराभवांनंतर बुमराहचा आशावाद

धवल कुलकर्णीकडे गती नसली तरीही मुंबई-पुण्याच्या मैदानावर खेळण्याचा त्याच्याकडे मोठा अनुभव आहे. तसेच नवा बॉल स्विंग करण्याची क्षमता असल्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा धवल कुलकर्णीला संघात दाखल करुन घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे मुंबईचे हे प्रयत्न आता यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IPL 2022 : इशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबई इंडियन्सची चूक – शेन वॉटसन

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT