Rohit Sharma : कोहलीनंतर रोहित शर्मानेही घेतला 'तो' निर्णय, म्हणाला...
Rohit Sharma Retired From T20 Cricket : विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर रोहित शर्मानेही चाहत्यांना धक्का दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेेटमधून निवृत्ती

विराट कोहलीनंतर रोहित शर्माने केली घोषणा

टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर शर्माचा निर्णय
Rohit Sharma News : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी दणदणीत पराभव करून T20 विश्वचषक जिंकला. देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. पण, दोन भारतीय क्रिकेटपटूंनी क्रिकेटप्रेमींना धक्का दिला. दोघांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. आधी विराट कोहलीने जाहीर केले की, हा त्याचा शेवटचा टी-20 क्रिकेट सामना होता, तर काही वेळाने कर्णधार रोहित शर्मानेही टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. (after Virat Kohli Rohit Sharma announced retirement from t20 international cricket)
आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरही ही माहिती दिली आहे. आयसीसीने लिहिले की, "विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे."
खरं तर, 37 वर्षीय रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 29 जून रोजी इतिहास रचला. भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले. या विश्वचषकासह भारताने चौथ्यांदा विश्वचषक (ODI, T20) जिंकला आहे.
हेही वाचा >> भारताचा ऐतिहासिक विजय, 13 वर्षानंतर जिंकला वर्ल्ड कप
भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या विश्वचषक विजयामुळे 140 कोटी भारतीयांना जल्लोष करण्याची सुवर्णसंधी मिळाली. पण, विजयाचा जल्लोष सुरू असतानाच कोहली आणि रोहित शर्माच्या टी-२० मधून निवृत्ती घेतल्याच्या घोषणेने क्रिकेट चाहत्यांनाही धक्का बसला.