वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा नसणार कर्णधार; सुनील गावस्करांचं मोठं विधान
Rohit sharma- Hardik Pandya : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी आपल्या एका विधानाने खळबळ उडवून दिली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर (World Cup) भारतीय संघाच्या कर्णधारपदात मोठा बदल होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. रोहित शर्माला हटवून ही जबाबदारी स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे सोपवली जाऊ शकते. (Rohit Sharma will not […]
ADVERTISEMENT

Rohit sharma- Hardik Pandya : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी आपल्या एका विधानाने खळबळ उडवून दिली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर (World Cup) भारतीय संघाच्या कर्णधारपदात मोठा बदल होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. रोहित शर्माला हटवून ही जबाबदारी स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे सोपवली जाऊ शकते. (Rohit Sharma will not be the captain after the World Cup; Big statement of Sunil Gavaskar)
यंदाच्या विश्वचषकानंतर एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा दावा करण्यासाठी हार्दिक पांड्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना जिंकावा लागेल, असा विश्वास गावस्कर यांनी व्यक्त केला. हा सामना शुक्रवारी होणार आहे.नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे मालिकेतील पहिल्या वनडेत खेळणार नाही. त्याच्या जागी पांड्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या वनडेत कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल.
29 वर्षीय पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामात पहिल्यांदाच चॅम्पियन बनवले. तो याआधीच आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने कर्णधार असताना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. कर्णधार असताना अष्टपैलू कामगिरी करून त्याने अनेकांना प्रभावित केले आहे.
Natasha Stankovic: ‘त्यानंतर’ 18 दिवसातच हार्दिक पांड्याच्या बायकोने केली कमाल…