Shoaib Malik सोबतच्या घटस्फोटावर अखेर सानिया मिर्झाने सोडलं मौन

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sania mirza shoaib malik divorce mirza family statement tennis player pakistani cricketer and sana javed
sania mirza shoaib malik divorce mirza family statement tennis player pakistani cricketer and sana javed
social share
google news

Sania Mirza And Shoaib Malik Divorce : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद (Sana Javed) सोबत त्याने लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यात शोएबने तिसरे लग्न केल्यानंतर सानिया मिर्झासोबत (Sania Mirza) त्याचा घटस्फोट झाला की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर यावर आता सानिया मिर्झाने मौन सोडलं आहे. शोएबसोबत  (Shoaib Malik) माझा काहीच महिन्यापूर्वी घटस्फोट झाला होता अशी माहिती देत, तिने शोएबला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (sania mirza shoaib malik divorce mirza family statement tennis player pakistani cricketer and sana javed)

इन्स्टा पोस्टमध्ये काय?

सानिया मिर्झाची बहिण अमन मिर्झाने तिच्या इस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमधून सानिया मिर्झाने तिच्या घटस्फोटावर भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये तिने लिहले की, सानियाने तिचे खाजगी आय़ुष्य नेहमीच चाहत्यांच्या नजरेपासून दुर ठेवले आहे. पण आज तिच्यावर काही गोष्टींचा खुलासा करण्याची वेळ आली आहे. शोएब आणि सानियाचा तलाक काहीच महिन्यांपूर्वी झाला आहे. आता सानिया शोएबला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे. तिच्या आयुष्याच्या या संवेदनशील काळात, मी सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना विनंती करू इच्छिते की त्यांनी कोणत्याही चर्चेत गुंतू नये आणि त्याच्या गोपनीयतेचा आदर करावा, असे या ,पोस्टमध्ये म्हटले गेले आहे.

हे ही वाचा : Manoj Jarange : “…तोपर्यंत जरांगे पाटलांनी थांबलं पाहिजे”, CM शिंदेंची विनंती

मुलाची जबाबदारी कुणावर?

शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचं लग्न 12 एप्रिल 2010 मध्ये हैद्राबादमधील एका पारंपारिक समारंभात पार पडलं होतं. लग्नाच्या तब्बल 8 वर्षानंतर 2018 मध्ये त्यांचा मुलगा इजहान मिर्झा मलिकचा जन्म झाला होता. इजहान आता 5 वर्षाचा झाला असून तो सध्या त्याच्या आईसोबत राहतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नावर सानिया मिर्झाच्या वडीलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ते ‘खुला’ आहे. तलाक आणि खुला यात फारसा फरक नाही. जेव्हा एखादी स्त्री विभक्त होण्याचा निर्णय घेते तेव्हा त्याला खुला म्हणतात. जेव्हा पुरुषाच्या बाजूने तोच निर्णय येतो तेव्हा त्याला घटस्फोट म्हणतात.

हे ही वाचा : अजित पवार म्हणाले, “तू माझी प्यारी प्यारी”; सभेत घडला किस्सा, सगळे हसून लोटपोट

दरम्यान शोएब अजूनही प्रोफेशनल क्रिकेटमध्ये अॅक्टीव आहे. तर सानिया मिर्झाने गेल्याच वर्षी टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती. 37 वर्षीय सानिया मिर्झा ग्रँड डबल्समध्ये 6 वेळा चॅम्पियन ठरली आहे. सानियाने दुहेरीत जिंकलेल्या सहा ग्रँडस्लॅम विजेतेपदांमध्ये तीन मिश्र दुहेरी आणि तितक्याच महिला दुहेरी विजेतेपदांचा समावेश आहे. तिने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून तिचे शेवटचे ग्रँडस्लॅम मिळवले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT