Video : She said Yes ! चेन्नईच्या दीपक चहरने सामना संपल्यावर केलं गर्लफ्रेंडला प्रपोज
IPL च्या चौदाव्या हंगामत प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या चेन्नईला अखेरच्या तीन सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला. दुबईच्या मैदानावर पंजाबविरुद्ध सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. विजयासाठी दिलेलं १३५ धावांचं आव्हान पंजाबने लोकेश राहुलच्या नाबाद ९८ रन्सच्या इनिंगच्या जोरावर पूर्ण केलं. चेन्नईने सामना गमावला असला तरीही त्यांचा खेळाडू दीपक चहरला एक मोठी लॉटरी लागली आहे. सामना संपल्यानंतर दीपकने […]
ADVERTISEMENT
IPL च्या चौदाव्या हंगामत प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या चेन्नईला अखेरच्या तीन सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला. दुबईच्या मैदानावर पंजाबविरुद्ध सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. विजयासाठी दिलेलं १३५ धावांचं आव्हान पंजाबने लोकेश राहुलच्या नाबाद ९८ रन्सच्या इनिंगच्या जोरावर पूर्ण केलं.
ADVERTISEMENT
चेन्नईने सामना गमावला असला तरीही त्यांचा खेळाडू दीपक चहरला एक मोठी लॉटरी लागली आहे. सामना संपल्यानंतर दीपकने आपल्या गर्लफ्रेंडला रोमँटीक पद्धतीने गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. दीपकच्या गर्लफ्रेंडनेही त्याला होकार दिला आहे. CSK ने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
She said yesssss.! ?
Congratulations Cherry.! Stay Merry.! ??#WhistlePodu #Yellove ?? pic.twitter.com/qVmvVSuI7A
— Chennai Super Kings – Mask P?du Whistle P?du! (@ChennaiIPL) October 7, 2021
चेन्नईच्या संघासाठी आजचा सामना फारसा चांगला गेला नाही. फलंदाजीत फाफ डु-प्लेसिसने एकाकी झुंज देत ७६ रन्स केल्या. परंतू लोकेश राहुलने नंतर चेन्नईच्या बॉलर्सची अक्षरशः धुलाई करत सामना एकतर्फी करुन टाकला. दीपक चहरने या सामन्यात शाहरुख खानची एकमेव विकेट घेतली. याव्यतिरीक्त शार्दुल ठाकूरने ३ विकेट घेतल्या.
हे वाचलं का?
दिल्ली कॅपिटल्सचा एक उनाड दिवस
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT