AFG vs SA: दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास; अफगाणिस्तानला पराभूत करून फायनलमध्ये धडक!
Semi Final T20 World Cup 2024 : T20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना आज (27 जून) सकाळी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. जो दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 9 विकेटने जिंकला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दक्षिण आफ्रिकेची फायनलमध्ये धडक
अफगाणिस्तानचं कुठे बिनसलं?
दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला
SA vs AFG Semi Final T20 World Cup 2024 : T20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना आज (27 जून) सकाळी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. जो दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 9 विकेटने जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे. कारण, त्यांच्या संघाने पहिल्यांदाच ICC T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. (south-africa vs afghanistan semi final live match highlights south-africa won the match)
ADVERTISEMENT
अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 8.5 षटकांत 60 धावा करून दक्षिण आफ्रिकेने 29 जून रोजी बार्बाडोस येथे होणाऱ्या फायनलसाठी आपली जागा निश्चित केली. आता फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना आज (27 जून) होणाऱ्या भारत किंवा इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनल विजेत्यासोबत होईल. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. यामुळे त्यांच्यासाठी हे एखाद्या स्वप्नाप्रमाणे आहे.
हेही वाचा : फडणवीस-पवार बाजूला अन् CM शिंदेंचा मुख्यमंत्री पदावरून विरोधकांवर निशाणा
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर हा सामना झाला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या हा निर्णय चुकीचा ठरला. अफगाणिस्तानचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात अवघ्या 56 धावांमध्येच ऑलआऊट झाला. अफगाणिस्तानची टी-20 इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या होती.
हे वाचलं का?
दक्षिण आफ्रिकेची फायनलमध्ये धडक
दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून रीझा हेंड्रिक्स आणि क्विंटन डी कॉक सलामीला आले. मात्र 5 धावा केल्यानंतर डी कॉक फजलहक फारुकीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. मात्र यानंतर रीझा हेंड्रिक्स (29) आणि कर्णधार एडन मार्करम (23) यांनी शेवटपर्यंत टिकून राहून संघाला विजयापर्यंत नेले. दोघेही नॉट आउट ठरले.
हेही वाचा : सायन-कोळीवाडा पुन्हा भाजपचा?, मविआ करणार बालेकिल्ला सर?
अफगाणिस्तानचं कुठे बिनसलं?
या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र अफगाणिस्तान संघ एकापाठोपाठ एक विकेट गमावत राहिला. परिणामी अफगाणिस्तानचा संघ 11.5 षटकांत अवघ्या 56 धावांत ऑलआउट झाला.
ADVERTISEMENT
अफगाणिस्तान संघात पहिली विकेट रहमानउल्ला गुरबाज (0) ची पडली. संघाच्या 4 धावांवर तो बाद झाला. यानंतर गुलबदीन नायब (9), इब्राहिम जादरान (2), मोहम्मद नबी (0) आणि नांगेलिया खरोटे (2) हे आउट झाले. हे पाच फलंदाज बाद झाले तेव्हा अफगाणिस्तान संघाची धावसंख्या 23/5 होती. यानंतर काही वेळात अजमतुल्ला उमरझाई (10) सुद्धा बाद झाला. उमरझाई बाद झाला तेव्हा अफगाणिस्तान संघाची धावसंख्या 28/6 होती.
ADVERTISEMENT
त्यानंतर 50 धावांच्या स्कोअरवर करीम जनात (8), नूर अहमद (0) यांना तबरेज शम्सीने बाद केले. यानंतर पुढच्याच षटकात कर्णधार राशिद खान (8) 50 धावांवर बाद झाला. त्यानंतर नवीन उल हक 56 धावांवर बाद होताच अफगाणिस्तानचा संघ ऑलआउट ठरला.
हेही वाचा : Vidhan Sabha Election 2024: धारावीचा पेपर सोपा, पण विधानसभेला उमेदवार कोण
दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला
आफ्रिकन संघ आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही ICC विश्वचषक (ODI-T20) चा फायनल खेळू शकलेला नाही. त्यावर चोकर्स नावाचा मोठा डाग होता. पण हा डागही निघून गेला. याआधी आफ्रिकेचा संघ अनेक वेळा सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. त्यांनी T20 विश्वचषक स्पर्धेत 2009 आणि 2014 मध्ये सेमीफायनल गाठली होती. पण ते फायनलमध्ये पोहचू शकले नाहीत. आता मात्र हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT