'मुख्यमंत्री बदलणार, देव पाण्यात बुडवून ठेवलेले...', फडणवीस-पवार बाजूला अन् CM शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

फडणवीस-पवार बाजूला अन् CM शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
फडणवीस-पवार बाजूला अन् CM शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
social share
google news

CM Shinde: मुंबई: राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून (27 जून) सुरुवात होणार आहे. यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीने चहापान आयोजित करण्यात आलं होतं. ज्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकाला. दरम्यान, यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबतही महत्त्वाचं विधान केलं. (cm will change god submerged in water devendra fadnavis ajit pawar aside and cm shinde targets opponents)

ADVERTISEMENT

'जेव्हा आमचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून काय म्हणत होते सरकार पडणार.. आता पडतंय, दोन महिन्यांनी पडतंय.. चार महिन्यांनी पडतंय.. असं म्हणता म्हणता, सरकार मजबूत होत गेलं आणि अजितदादा आले आमच्यासोबत.. मग मुख्यमंत्री बदलणार.. देव पाण्यात बुडवून तुम्ही ठेवले. पण काही झालं का? 30 तारखेला 2 वर्ष होतायेत सरकारला..' असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. याचवेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही बसले होते. 

पाहा CM शिंदे नेमकं काय-काय म्हणाले?

'विरोधकांची तुमच्यासमोर येऊन खोटं बोल रेटून बोल.. जी वस्तुस्थितीच नाही ती वस्तुस्थिती समोर आणून आणि स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची अशा प्रकारचा जो काही त्यांचा अविर्भाव आहे.. गेल्या वेळेस मी म्हणालो होतो की, अवसान गळालेलं, गोंधळलेला विरोधी पक्ष. पण यावेळेला तुमच्यासमोर थोडंसं छाती फुगवून आले असतील.'

हे ही वाचा>> नवाब मलिक जिंकणार की हरणार?, 'त्या' निर्णयावर सारं अवलंबून!

'लोकसभेमध्ये आलेलं अपयश यामुळे सत्ताधारी पोकळ आश्वासनांचं घोषणा करतील असं म्हणतील. अरे कोणाचं अपयश आहे? मोदीजींना हरवा हरवा म्हणून जंग जंग पछाडलं तुम्ही.. मोदी द्वेषाने पछाडले. संविधान बदलणार हे खोटं नरेटिव्ह सेट केलं. आरक्षण जाणार हे म्हटलं.' 

हे वाचलं का?

'गावागावात खोटं नरेटिव्ह पसरवून तुम्ही काही प्रमाणात तुम्हाला क्षणिक आनंद मिळालाय.. पण एवढं करून काँग्रेसला किती जागा मिळाल्या? तर 99.. तर तीन टर्ममध्ये म्हणजे 15 वर्ष झाली तुम्हाला 240 पर्यंत किती वर्ष जातील. 25 वर्ष लागतील..' 

'एवढं करून काय झालं मोदी पंतप्रधान झाले. देशातील लोकांनी त्यांना मतदान केलं. मोदी जिंकले आणि तुम्ही हरले.. तरी सुद्धा आमचे काही लोकं दुसऱ्याच्या वरातीत नाचणारे.. बेगानी शादी मे अब्दुला दिवाना.. अरे काय चाललंय तुमचं.. किती मतं मिळाली तुम्हाला.. उबाठाचं सांगायचं तर उबाठासमोर आम्ही 13 लढलो आणि 7 जागा जिंकलो.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Vidhan Sabha Election 2024: धारावीचा पेपर सोपा, पण विधानसभेला उमेदवार कोण

'ही आता आलेली सूज आहे..  ती आता उतरेल. फसवून दिशाभूल करून मतं मिळवली आहेत. लोकांना पण कळतंय आता.' 

ADVERTISEMENT

'जेव्हा आमचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून काय म्हणत होते सरकार पडणार.. आता पडतंय, दोन महिन्यांनी पडतंय.. चार महिन्यांनी पडतंय.. असं म्हणता म्हणता, सरकार मजबूत होत गेलं आणि अजितदादा आले आमच्यासोबत..' 

'मग मुख्यमंत्री बदलणार.. देव पाण्यात बुडवून तुम्ही ठेवले. पण काही झालं का? 30 तारखेला 2 वर्ष होतायेत सरकारला.. एक मजबूत सरकार महाराष्ट्राने पाहिलं आहे. तुम्ही काय दिलं शेतकऱ्यांना..' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

आता अधिवेशनात विरोधक सरकारला नेमकं कसं घेरणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT