Team India : टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार, T20 साठी 'या' खेळाडूच्या खांद्यावर धुरा
Team India Squad Announced for Sri Lanka Tour: टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर निघाली आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने टी20 चा कर्णधार बदलला आहे.
ADVERTISEMENT
Team India Squad Announced for Sri Lanka Tour:झिम्बाब्वेला मायदेशात पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर निघाली आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने (Team India) टी20 चा कर्णधार बदलला आहे. सुर्यकुमार यादवच्या (Surykumar Yadav) खांद्यावर टी20 ची धुरा देण्यात आली आहे. (suryakumar yadav team india t20 captain shubman gill vice captain team india squad announced for sri lanka tour)
ADVERTISEMENT
खरं तर श्रीलंका दौऱ्यासाठी खूप मोठे बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या नेतृत्वात पहिल्यांदाच टीम इंडिया श्रीलंकेविरूद्ध मालिका खेळणार आहे. गौतम गंभीर आता त्याच्या नव्या भूमिकेसाठी सज्ज दिसत आहे. अलीकडेच बीसीसीआयने त्यांना भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनवले आहे. गंभीरने राहुल द्रविडची जागा घेतली आहे, ज्याचा कार्यकाळ T20 विश्वचषक 2024 नंतर संपला होता.
हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana : 'या' कागदपत्रात मिळाली मोठी सूट, आली नवीन अपडेट
श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्यासाठी भारतीय संघाचीही घोषणा केली आहे. यासोबत टी20 संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे.
हे वाचलं का?
दरम्यान शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने नुकतेच घरच्या मैदानावर 5 सामन्यांच्या T20 मालिकेत झिम्बाब्वेचा 4-1 ने पराभव केला. यापूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता.
हे ही वाचा : Aanvi Kamdar Death: Video शूट करता-करताच गेला मुंबईच्या तरुणीचा जीव, तिथे गेली अन्...
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
भारताचा T20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर सन पटेल, वॉशिंग , रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
ADVERTISEMENT
भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग , रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.
ADVERTISEMENT
भारत-श्रीलंका सामन्यांचे वेळापत्रक
27 जुलै पहिला टी20, पल्लेकेले
28 जुलै दुसरा टी20, पल्लेकेले
30 जुलै तिसरा टी20, पल्लेकेले
वनडे वेळापत्रक
2 ऑगस्ट पहिला वनडे, कोलंबो.
4 ऑगस्ट दुसरा वनडे, कोलंबो,
7 ऑगस्ट तिसरा वनडे, कोलंबो,
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT