T-20 World Cup : भारतीय संघात महत्वाचे बदल, मुंबईकर शार्दुल ठाकूरला संघात स्थान
आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयने आज याबद्दलची माहिती दिली आहे. मुंबईकर शार्दुल ठाकूरला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं आहे. अक्षर पटेलच्या जागी शार्दुल भारतीय संघात खेळेल. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा करताना बीसीसीआयने शार्दुल ठाकूरला राखीव खेळाडूंच्या गटात ठेवलं होतं. परंतू यात बदल करुन बीसीसीआयने शार्दुलला मुख्य संघात तर […]
ADVERTISEMENT
आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयने आज याबद्दलची माहिती दिली आहे. मुंबईकर शार्दुल ठाकूरला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं आहे. अक्षर पटेलच्या जागी शार्दुल भारतीय संघात खेळेल.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा करताना बीसीसीआयने शार्दुल ठाकूरला राखीव खेळाडूंच्या गटात ठेवलं होतं. परंतू यात बदल करुन बीसीसीआयने शार्दुलला मुख्य संघात तर अक्षर पटेलला राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान दिलं आहे.
? NEWS ?: Shardul Thakur replaces Axar Patel in #TeamIndia's World Cup squad. #T20WorldCup
More Details ?
— BCCI (@BCCI) October 13, 2021
टी-२० विश्वचषकासाठी असा असेल भारताचा संघ –
हे वाचलं का?
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (व्हाईस कॅप्टन), लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेट किपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन आश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
राखीव खेळाडू –
ADVERTISEMENT
श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि अक्षर पटेल
ADVERTISEMENT
T-20 World Cup : भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा लूक पाहिलात का? BCCI ने शेअर केला फोटो
याव्यतिरीक्त बीसीसीआयने भारतीय संघाच्या मदतीसाठी काही खेळाडूंना आयपीएल संपल्यानंतरही युएईत थांबण्याचे आदेश दिले आहेत. आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरिवाला, व्यंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाद अहमद आणि कृष्णप्पा गौथम हे खेळाडू भारतीय संघासोबत बायो बबलमध्ये सहभागी होणार आहेत.
T-20 World Cup मध्ये यंदा पहिल्यांदाच DRS चा वापर, ICC चा महत्वपूर्ण निर्णय
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT