AFG vs AUS: अफगाणिस्तानने केला उलटफेर, ऑस्ट्रेलियाला पराभूत करून कशी मारली बाजी?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा अफगाणिस्तानने घेतला बदला 

point

फलंदाजी करत गुरबाज-जादरान यांनी उडवली सर्वांची झोप

T20 World Cup Highlights AFG vs AUS : ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये 'सुपर 8' साठीची लढाई अजूनही सुरूच आहे. आज 23 जून रोजी सकाळी किंग्सटाउन येथील अर्नोस वेल मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी 149 धावा करायच्या होत्या, पण त्यांचा संघ 19.5 षटकात 127 धावाच करू शकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पहिला विजय ठरला आहे. (t20 world cup 2024 afghanistan did the reverse how did they beat australia)

ADVERTISEMENT

एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा अफगाणिस्तानने घेतला बदला 

अफगाणिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला तो गुलबदिन नायब... ज्याने चार विकेट घेत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. यासह अफगाणिस्तानने गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. गेल्या वर्षी विश्वचषकात अफगाणिस्तान संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. पण ग्लेन मॅक्सवेलने ऐतिहासिक द्विशतक झळकावत अफगाणिस्तानकडून सामना हिसकावून घेतला.

हेही वाचा : Pune Accident : आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले, एकाचा जागी मृत्यू

आता या सामन्यातही ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानकडून सामना हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेरच्या क्षणी त्याची विकेट घेत गुलबदिनने ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर आणले. मॅक्सवेलने 41 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 59 धावा केल्या. गुलबदिन नायबने चार विकेट घेतल्या, तर नवीन उल हकने तीन खेळाडूंना बाद केले. याशिवाय अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हे वाचलं का?

अफगाणिस्तानच्या विजयाने आता ग्रुप-1 चे समीकरण रंजक बनले आहे. दोन सामन्यांतील विजयाने भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आता भारताला ऑस्ट्रेलियाशी सामना करायचा आहे. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला तर त्यांच्या अडचणी वाढतील. अशावेळी अफगाणिस्तानसाठी मोठी संधी असेल आणि जर त्यांनी बांगलादेशला पराभूत केले तर ते सुपर 8 मध्ये पोहोचेल. भारताचे उपांत्य फेरीतील स्थान देखील अद्याप पूर्णपणे निश्चित झालेले नाही. कारण यासाठी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवावा लागेल.

हेही वाचा : येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडणार, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

फलंदाजी करत गुरबाज-जादरान यांनी उडवली सर्वांची झोप

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सहा गडी गमावून 148 धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने 49 चेंडूत 60 धावांची सर्वोच्च खेळी खेळली, ज्यात चार चौकार आणि तब्बल 4 षटकारांचा समावेश होता. तर इब्राहिम जादरानने 48 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. गुरबाज-जादरान यांनी 15.5 षटकांत 118 धावांची खेळी खेळल्याने अफगाणिस्तान संघाला आघाडी मिळाली. 

ADVERTISEMENT

हेही वाचा : 'तुझं ते माझ्या बापाचं हे चाललंय BJP चं..', रामदास कदमांनी उडवून दिली खळबळ!

 

या सामन्यात कमिन्सने ऑस्ट्रेलियासाठी हॅटट्रिक घेतली. कमिन्सने रशीद खान, करीम जनात आणि गुलबदिन नायब यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले. पॅट कमिन्सने सलग दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. याआधी बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही त्याने हॅटट्रिक घेतली होती. याशिवाय ॲडम झाम्पाने दोन आणि मार्कस स्टॉइनिसने एक विकेट घेतली. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT