T-20 World Cup चं आयोजन युएईत, BCCI आगामी बैठकीत ICC ला माहिती देणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आगामी टी-२० वर्ल्डकपचं आयोजन भारताबाहेर होणार हे आता जवळपास निश्चीत झालं आहे. BCCI आगमी बैठकीत ICC ला याविषयी माहिती देणार असून १७ ऑक्टोबरपासून युएईत या स्पर्धेला सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. १४ नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. अबु धाबी, शारजाह, दुबई या शहरांत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

ADVERTISEMENT

टी-२० विश्वचषकाचं आयोजन बीसीसीआय भारतात करण्याच्या प्रयत्नात होतं. परंतू दोन प्रमुख मुद्द्यांमुळे या प्रयत्नांना खीळ बसल्याचं कळतंय. भारत सरकारकडून कर सवलतीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यात बीसीसीआयला अपयश आलंय. याचसोबत मे महिन्यात आयपीएलचा हंगाम मध्यावधीत स्थगित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडू भारतात स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक आहेत की नाही यावरुन बीसीसीआय संभ्रमात होतं. ज्यामुळे ही स्पर्धा युएईत आयोजित करण्याच्या निर्णयावर एकमत झाल्याचं समजतंय.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने आपल्याशी संलग्न असलेल्या सर्व राज्य क्रिकेट संघटनांशी व्हर्च्युअल बैठक घेऊन आयोजनाबद्दल चर्चा केली. या बैठकीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ही स्पर्धा युएईत हलवली जाऊ शकते याबद्दल माहिती दिली. टी-२० वर्ल्डकप भारतात आयोजित झाल्यास बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात कर द्यावा लागू शकतो. पण हीच स्पर्धा युएईत आयोजित केल्या, बीसीसीआयचा ४१ टक्के खर्च कमी होणार आहे.

हे वाचलं का?

भविष्यात येऊ शकणारी कोरोनाची तिसरी लाट, Delta Varient ची भीती लक्षात घेता बीसीसीआय टी-२० विश्वचषकासारखी स्पर्धा भारतात आयोजित करण्याची जोखीम स्विकारायला तयार नाहीये. ICC ने या स्पर्धेसाठी युएई हा अधिकृत पर्याय तयार ठेवला होता. त्यामुळे आयसीसी याबद्दल अधिकृत घोषणा कधी करतंय याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.

BLOG : प्रश्न इतकाच की BCCI ती हिंमत दाखवणार का?

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT