T20 World Cup : न्यूझीलंडच्या विजयासोबत टीम इंडियाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचं यंदाच्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. बहुचर्चित न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात अपेक्षेप्रमाणे न्यूझीलंडने सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चीत केलंय. त्यामुळ ब गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.

ADVERTISEMENT

अफगाणिस्तानने आजच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवलं असतं तरभारताला उद्या होणाऱ्या नामिबीयाच्या सामन्यात उपांत्य फेरीची संधी मिळाली असती. परंतू अफगाणिस्तानच्या पराभवानंतर भारताचं उरलंसुरलं आव्हान संपुष्टात आलंय.

बहुचर्चित सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. परंतू त्यांचा हा निर्णय सामन्यात पूर्णपणे फसला. हजरतउल्ला झझाई, मोहम्मद शहझाद, रहमानुल्लाह गुरबाज हे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर मधल्या फळीत गुलबदीन नैब, नझीबउल्ला झरदान आणि मोहम्मद नबी यांनी मैदानावर तग धरुन संघाचा डाव सावरला. झरदानने ४८ बॉलमध्ये ६ फोर आणि ३ सिक्स लगावत ७३ रन्स केल्या. झरदानच्या या इनिंगमुळे अफगाणिस्तानचा संघ १२४ धावांपर्यंत मजल मारु शकला.

हे वाचलं का?

प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडची सुरुवात सावध झाली. मुजीब उर रेहमानने डॅरेल मिचेलला आऊट करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर केन विल्यमसन आणि मार्टीन गप्टील यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. राशिद खानने गप्टीलला क्लिन बोल्ड करत न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. परंतू तोपर्यंत पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. विल्यमसन आणि कॉनवे जोडीने नंतर संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. न्यूझीलंडच्या या विजयामुळे उद्या होणारा भारत विरुद्ध नामिबीया हा सामना फक्त औपचारिकतेचा राहिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT