TATA उद्योगसमुह घेणार VIVO ची जागा, यंदाच्या हंगामापासून देणार स्पॉन्सरशीप
जगातली सर्वात श्रीमंत क्रिकेट लिग म्हणून ओळख असलेल्या आयपीएल आणि टाटा उद्योग समुहाचं नातं जोडलं जाणार आहे. स्पर्धेच्या मुख्य स्पॉन्सरशीपसाठी TATA उद्योगसमुहाने बाजी मारली आहे. यंदाच्या हंगामापासून टाटा उद्योगसमहून चिनी मोबाईल कंपनी VIVO ची जागा घेणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दल माहिती दिली. बीसीसीआय आणि व्हिवो कंपनीत झालेल्या करारानुसार […]
ADVERTISEMENT
जगातली सर्वात श्रीमंत क्रिकेट लिग म्हणून ओळख असलेल्या आयपीएल आणि टाटा उद्योग समुहाचं नातं जोडलं जाणार आहे. स्पर्धेच्या मुख्य स्पॉन्सरशीपसाठी TATA उद्योगसमुहाने बाजी मारली आहे. यंदाच्या हंगामापासून टाटा उद्योगसमहून चिनी मोबाईल कंपनी VIVO ची जागा घेणार आहे.
ADVERTISEMENT
आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दल माहिती दिली. बीसीसीआय आणि व्हिवो कंपनीत झालेल्या करारानुसार प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला ४०० कोटींचा निधी मिळत होता.
Tata Group to replace Chinese mobile manufacturer Vivo as IPL title sponsor this year: IPL Chairman Brijesh Patel to PTI
— Press Trust of India (@PTI_News) January 11, 2022
VIVO मोबाईल कंपनी आणि आयपीएल यांचं नातं विवादास्पद राहिलेलं होतं. गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षानंतर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली होती. यावेळी बीसीसीआयवरही क्रिकेटप्रेमींनी VIVO कंपनीची स्पॉन्सरशीप सोडण्यासाठी दबाव टाकला होता. जनभावनेचा आदर करत २०२० सालच्या स्पर्धेसाठी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने VIVO कंपनीसोबतचा करार एका वर्षासाठी स्थगित करत Dream 11 कंपनीला स्पॉन्सरशीपचे हक्क दिले होते.
हे वाचलं का?

VIVO आणि BCCI यांच्यातला करार २०२२ मध्ये संपुष्टात येणार होता, ज्यानंतर बीसीसीआयने टाटा उद्योगसमुहाची स्पॉन्सरशीपसाठी निवड केली आहे. दोन वर्षांपूर्वी देखील टाटा उद्योगसमुह स्पॉन्सरशीपच्या शर्यतीत होता, परंतू तांत्रिक कारणामुळे त्यांना ऐनवेळी आपला अर्ज मागे घ्यावा लागला होता. परंतू दोन वर्षांनी आयपीएलने भारतीय क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन केलं आहे. बॅडमिंटन, कुस्ती नंतर टाटा उद्योगसमुह क्रिकेटमध्येही आपली गुंतवणूक करणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT