World Cup 2023: भारताची फायनलमध्ये धडक, 2019 च्या वर्ल्ड कप पराभवाचा घेतला बदला
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली. वानखडेवर आलेल्या मोहम्मद शमीच्या वादळासमोर तर न्युझीलंडच्या एकाही फलंदाजाचा निभाव लागला नाही. मोहम्मद शमीने या सामन्यात 7 विकेट घेतली. तर बुमराह, सिराज आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
ADVERTISEMENT
Team India won Semi final Against New Zealand Reach Semi Final : मुंबईच्या वानखडे स्टेडिअमवर रंगलेली सेमी फानयलची (Semi Final) लढत टीम इंडियाने (Team India) जिंकली आहे. न्युझीलंडचा 70 धावांनी पराभव करुन टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने हा विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे. इतकचं नाहीतर टीम इंडियाने हा सामना जिंकून न्युझीलंडकडून 2019 च्या वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेतला आहे. टीम इंडियाचा विजयाचा शिल्पकार मोहम्मद शमी ठरला आहे. शमीने या सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत.शमीच्या गोलंदाजीसमोर एकाही न्यूझीलंडच्या खेळाडू टीकू शकला नाही आणि ते ऑल आऊट झाले. (team india reach final won semi final agaist new zealand mohmmed shami odi world cup 2023)
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय टीम इंडियाने यशस्वी करून दाखवला. विराट कोहलीच्या ऐतिहासिक 117 धावा, श्रेयस अय्यरची ताबडतोड 105 धावांची शतकी खेळी आणि शुभमन गिलची नाबाद 80 धावाची खेळी या बळावर टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 397 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे न्युझीलंडसमोर जिंकण्यासाठी 398 धावांचे होते.
हे ही वाचा : Video : सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच औक्षण, काटेवाडीतली भाऊबीज पाहिलीत का?
टीम इंडियाने दिलेल्या 398 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्युझीलंडची सुरूवात चांगली झाली नाही. न्युझीलंडकडून सलामीला उतरलेले डेवॉन कॉन्वे आणि रचिन रविंद्र अवघ्या 13 धावावर आऊट झाले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या केन विल्यम्सन आणि डेरेन मिचेलने न्युझीलंडने डाव सावरला होता. दोघांनी मिळून टीचून फलंदाजी केली आणि भारतीय गोलंदाजांना विकेट घेऊ दिली नाही.
हे वाचलं का?
यानंतर 69 धावावर खेळत असताना विल्यम्सन आऊट झाला आणि इथूनच्या भारताच्या पारड्यात सामना गेला. डेरेन मिचेलने यावेळी 134 धावांची शतकी खेळी करून एकाकी झूंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील आऊट झाला. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर न्य़ुझींलडचा एकही फलंदाज टीकू शकला नाही आणि एकामागून एक विकेट पडले.अशाप्रकारे 327 धावावर न्युझीलंड ऑलआऊट झाली आहे. आणि टीम इंडियाने 70 धावांनी हा सामना जिंकला आहे.
हे ही वाचा : Advay Ahire : ठाकरे गटाच्या नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली. वानखडेवर आलेल्या मोहम्मद शमीच्या वादळासमोर तर न्युझीलंडच्या एकाही फलंदाजाचा निभाव लागला नाही. मोहम्मद शमीने या सामन्यात 7 विकेट घेतली. तर बुमराह, सिराज आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT