Tokyo Olympic : पदकविजेतच्या Mirabai ची इच्छा पूर्ण, Dominos India कडून मिळणार आयुष्यभर मोफत पिझ्झा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वेटलिफ्टींग प्रकारात भारताला रौप्यपदकाची कमाई करुन देणाऱ्या मीराबाई चानूवर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. तब्बल २१ वर्षांनी मीराबाईने वेटलिफ्टींग प्रकारात भारताला पदक मिळवून दिलं. रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी गमावलेल्या मीराबाईने मेहनत करुन पदकाला गवसणी घातली.

ADVERTISEMENT

या कामगिरीनंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मीराबाईने आता मी पिझ्झा खाणार असल्याचं सांगितलं. टोकियोच्या सरावासाठी मी बरेच दिवस झाले पिझ्झा खाऊ शकले नव्हते. दरम्यान Dominos India ने मीराबाईची ही इच्छा पूर्ण करत तिला आयुष्यभरासाठी फ्री पिझ्झा देण्याचं जाहीर केलंय.

शुक्रवारी पदकाची कमाई केल्यानंतर मीराबाईच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. यावेळी मीराबाईने घातलेले कानातले विशेषकरुन चमकत होते. मीराबाईच्या आईने आपले दागिने विकत मीराबाईला ऑलिम्पिकच्या चिन्हासारखे कानातले दिले होते. २०१६ साली आपली मुलगी पदक जिंकेल असा मीराबाईच्या आईला विश्वास होता. परंतू मागच्या स्पर्धेत ही संधी हुकली. परंतू मीराबाईने हार न मानता सराव आणि मेहनत सुरु ठेवत आपल्या आईचा विश्वास सार्थ ठरवून दाखवला.

हे वाचलं का?

Tokyo Olympic : सर आपलं स्वप्न पूर्ण झालं ! ऐतिहासिक कामगिरीनंतर Mirabai ने मानले कोचचे आभार

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT