Tokyo Olympic 2020 : भारतीय महिला हॉकी संघाला बाद फेरीचं तिकीट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कॅप्टन राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकच्या बाद फेरीचं तिकीट मिळालं आहे. अ गटाच्या अखेरच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला २-० ने हरवलं. आयर्लंडच्या संघाचा पराभव झाल्यानंतर भारतीय महिला संघाचं बाद फेरीतलं स्थान निश्चीत झालं. अ गटात भारतीय महिलांचा संघ चौथ्या स्थानावर राहिला.

साखळी फेरीत पहिले ३ सामने गमावल्यानंतर भारताने आयर्लंडला १-० तर दक्षिण आफ्रिकेला ४-३ असं हरवलं. परंतू बाद फेरीत जाण्यासाठी भारतीय संघाला ब्रिटन विरुद्ध आयर्लंड सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावं लागणार होतं.

वंदना कटारियाने केलेल्या गोलच्या हॅटट्रीकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमधलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. आयर्लंडचा पराभव केल्यानंतर भारतीय महिलांनी ४-३ च्या फरकाने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेच्या महिलांचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. तरीही या सामन्यात त्यांनी तीनवेळा भारतासोबत बरोबरी केली. परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वंदनाने या सामन्यात चौथ्या, १७ व्या आणि ४९ व्या मिनीटाला गोल केले. नेहा गोयलनेही ३२ व्या मिनीटाला गोल केला. संपूर्ण सामन्यात भारतीय महिलांनी बॉलवर चांगल्या पद्धतीने ताबा ठेवला होता, परंतू दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमणाला थोपवणंही त्यांना जमलं नाही. साखळी फेरीत सर्व सामने गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात चांगली झुंज दिली. टॅरीन ग्लासबाय, कॅप्टन एरिन हंटर आणि मारिझेन मारीस यांनी आफ्रिकेकडून गोल केले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT