Tokyo Paralympics : हरविंदर सिंगचा निशाणा पदकावर, तिरंदाजीत भारताला पहिलं पदक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात तिरंदाजीत पहिलं पदक मिळवून भारताच्या हरविंदर सिंगने इतिहास घडवला आहे. हरविंदरला कांस्यपदक मिळालं आहे.

उपांत्य फेरीत हरविंदरला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्याच्यासमोर कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाच्या किम मीन सू चं आव्हान होतं. या अटीतटीच्या लढतीत हरविंदरने किमवर मात करत कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताचं हे १३ वं पदक ठरलं आहे.

आजच्या दिवशी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने पदकांची हॅटट्रीक केली आहे. आधी प्रवीण कुमारने उंच उडीत रौप्य तर नेमबाज अवनी लेखराने कांस्यपदकाची कमाई केली होती. भारताच्या खात्यात सध्या २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ ब्राँझ पदकं जमा आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरविंदरशी फोनवरुन संवाद साधत त्याला शुभेच्छा दिल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानावर असलेल्या हरविंदरने २०१८ साली आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. हे पदकं हरविंदरचं सर्वात पहिलं मोठं पदक होतं. पंजाब युनिव्हर्सिटीमधून हरविंदरने अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलेलं आहे.

Tokyo Paralympics : अवनी लेखराला दुसरं पदक, ५०.मी एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई

ADVERTISEMENT

ब्राँझ पदकासाठीच्या सामन्यात ३१ वर्षीय हरविंदर ५-३ ने आघाडीवर होता. परंतू कोरियाच्या किमने पाचवा सेट जिंकत सामन्यात बरोबरी केली. परंतू मोक्याच्या क्षणी कोरियाच्या किमचा बाण केवळ ८ गुणांची कमाई करु शकला तर हरविंदरने १० गुण मिळवत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केलं.

ADVERTISEMENT

कांस्यपदकासाठीच्या लढतीत हरविंदरची स्कोअरलाईन काहीशी अशी होती.

(26-24, 27-29, 28-25, 25-25, 26-27) (10-8)

हरविंदरने या स्पर्धेत पहिल्या फेरीत इटली तर दुसऱ्या फेरीत रशियन खेळाडूवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. परंतू उपांत्य फेरीत अमेरिकेच्या केविन मॅथर कडून त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

Tokyo Olympic Explainer : तिरंदाजीत दक्षिण कोरिया कसं गाजवतं एकहाती सत्ता? काय आहे त्यांच्या यशामागचं रहस्य?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT