Tokyo Olympics मध्ये अमेरिका आणि चीनचं वर्चस्व, भारताची आतापर्यंत विक्रमी कामगिरी
२३ जुलैपासून सुरु झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची आज सांगता झाली. सुमारे दोन आठवडे चाललेल्या या स्पर्धेत शेवटचा दिवस भारतासाठी अत्यंत चांगला ठरला. भालाफेकीत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई करत सर्व देशवासियांना आनंदाचे क्षण दिले. नीरज व्यतिरीक्त अखेरच्या दिवशी बजरंग पुनियानेही कुस्तीत कांस्यपदकाची कमाई केली. ऑलिम्पिक इतिहासातली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. २०१२ […]
ADVERTISEMENT
२३ जुलैपासून सुरु झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची आज सांगता झाली. सुमारे दोन आठवडे चाललेल्या या स्पर्धेत शेवटचा दिवस भारतासाठी अत्यंत चांगला ठरला. भालाफेकीत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई करत सर्व देशवासियांना आनंदाचे क्षण दिले. नीरज व्यतिरीक्त अखेरच्या दिवशी बजरंग पुनियानेही कुस्तीत कांस्यपदकाची कमाई केली.
ADVERTISEMENT
ऑलिम्पिक इतिहासातली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने ६ पदकं जिंकली होती. यंदाच्या स्पर्धेत भारताने ७ पदकं जिंकली आहेत. यंदा भारताची कामगिरी ही १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्यपदक अशी राहिलेली आहे. पदकतालिकेत भारत ४८ व्या स्थानावर राहिलेला असून अमेरिका आणि चीनने या स्पर्धेवर वर्चस्व गाजवलेलं आहे.
BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये ‘फिनीक्स’भरारी
हे वाचलं का?
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याचा मान अमेरिकेने पटकावला असून ११३ पदकांसह त्यांनी पहिलं स्थान पटकावलं असून चीनने ८८ पदकांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. अमेरिकेच्या खात्यात ३९ सुवर्णपदकं, ४१ रौप्यपदकं आणि ३३ कांस्यपदकं आहेत. दुसरीकडे चीनच्या खात्यात ३८ सुवर्णपदकं, ४१ रौप्यपदकं आणि १८ कांस्यपदकं आहेत. यजमान जपान ५८ पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेल्या सात पदकांत भालाफेक खेळात नीरज चोप्राला सुवर्णपदक, वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि पैलवान रवी दहियाला रौप्य पदक मिळालं. बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू आणि पैलवान बजरंग पूनियासह बॉक्सर लवलीना बोर्गोहेनला कांस्य पदक मिळालं. याशिवाय सांघिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT