वासिम जाफरवरील आरोप व राजीनाम्याची चौकशी होणार
काही दिवसांपूर्वी माजी मुंबईकर आणि टीम इंडियाचा ओपनर वासिम जाफरवर उत्तराखंड संघाचा प्रशिक्षक या नात्याने संघात मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचे आरोप करण्यात आले. वासिमने आपली बाजू मांडताना संघटनेचे पदाधिकारी संघनिवडीत हस्तक्षेप करुन दबाव आणत असल्याचं सांगितलं. भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूवर धर्माचे आरोप केल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. अनेक माजी खेळाडूंनी याप्रकरणात वासिम जाफरला […]
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी माजी मुंबईकर आणि टीम इंडियाचा ओपनर वासिम जाफरवर उत्तराखंड संघाचा प्रशिक्षक या नात्याने संघात मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचे आरोप करण्यात आले. वासिमने आपली बाजू मांडताना संघटनेचे पदाधिकारी संघनिवडीत हस्तक्षेप करुन दबाव आणत असल्याचं सांगितलं. भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूवर धर्माचे आरोप केल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
ADVERTISEMENT
अनेक माजी खेळाडूंनी याप्रकरणात वासिम जाफरला आपला पाठींबा दर्शवला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी याप्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे अधिकारी मुख्यमंत्री रावत यांना भेटले होते. या बैठकीत वासिम जाफरचा मुद्दा आल्यानंतर रावत यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
अवश्य वाचा – दंगलीत घर जळालेल्या खेळाडूला जेव्हा MCA आधार देतं…
हे वाचलं का?
उत्तराखंड संघटनेचे सचिव महिम वर्मा यांनी वासिमवर आरोप केल्यानंतर जाफरने पत्रकार परिषद घेऊन आपलं स्पष्टीकरण दिलं होतं. संघटनेचे पदाधिकारी जर निवडीत हस्तक्षेप करणार असतील तर आपल्याला काम करता येणार नाही असं जाफरने म्हटलं होतं. उत्तराखंड संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये नमाज पठनासाठी मौलवींना बोलवून संघाचं वातावरण बिघडवल्याचा आरोपही जाफरवर ठेवण्यात आला होता.
अवश्य वाचा – दंगलीनंतरचा तो काळ, शिवसेनेची हमी आणि झहीर मुंबईतच राहिला!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT