14 व्या वर्षीच IPL खेळला अन् पहिल्याच चेंडूत सिक्स; Google CEO ला चकित करणारा वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सर्वांनाच आपल्या खेळीने थक्क करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने केवळ 14 वर्षांच्या वयातच IPL मध्ये पदार्पण केले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गूगलच्या CEO ने सुद्धा भरभरुन कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

14 वर्षांच्या वयात IPL मध्ये डेब्यू करणारा वैभव सूर्यवंशी कोण?

गूगलच्या CEO ने केलं कौतुक

IPL मध्ये पदार्पण करताच वैभवच्या नावावर विक्रम
Who is Vaibhav Suryavanshi: IPL 2025 मधील शनिवारचा दिवस हा क्रिकेटप्रेमींसाठी खूपच खास ठरला. राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील रोमांचक सामन्यात लखनऊने २ धावांनी विजय मिळवला. पण या मॅचचं खरं आकर्षण म्हणजे राजस्थानकडून खेळणारा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी. वैभवने क्रिकेट विश्वात पदार्पण करताच बरेच विक्रम केले.
अगदी कमी वयात IPL डेब्यू
वैभव सूर्यवंशीने केवळ 14 वर्षे आणि 13 दिवसांच्या वयात आयपीएलमध्ये पदार्पण केले. यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम रे बर्मनच्या नावावर होता, ज्याने 16 वर्षे 157 दिवसांच्या वयात आरसीबीकडून IPL डेब्यू केले होते. वैभवने केवळ त्याच्या कमी वयामुळेच नव्हे तर त्याच्या पहिल्याच शॉटने सर्वांचे मन जिंकले. त्याने पहिल्याच चेंडूवर एक शानदार सिक्स मारून एका विशेष क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले.
कमी वयातच बनला स्टार खेळाडू
वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांना करारबद्ध केले. यापूर्वी, वैभवने अंडर-19 कसोटीत फक्त 58 चेंडूत शतक ठोकले होते. वैभवने अंडर-19 आशिया कपमध्येही 176 धावांची खेळी केली होती. याशिवाय, त्याच्या नावावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक त्रिशतकही आहे. अलिकडेच त्याने जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत नेट्समध्ये अभ्यास केला होता.
हे ही वाचा: पैसा-पाणी: UPI वारंवार का होतं डाऊन?, पैसा हेच कारण!