कोहली-बाबर, आफ्रिदी-बुमराह खेळणार एकाच संघात?, ACC स्पर्धा सुरु करण्याच्या तयारीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील खेळाडू एकाच संघात खेळू शकतात याची आपण कल्पना करू शकता का?. सध्याच्या परिस्थीतीमध्ये दोन्ही देशातील चाहते हा विचार करु शकत नाही. परंतु आशिया क्रिकेट परिषद असाच काहीसा विचार करत आहे. वास्तविक, आशिया क्रिकेट परिषद 2023 मध्ये होणाऱ्या आफ्रो-आशिया चषकाचे पुन्हा आयोजन करण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) एकत्र फलंदाजी करताना आणि शाहीन आफ्रिदी आणि जसप्रीत बुमराह एकत्र गोलंदाजी करताना दिसतील.

ADVERTISEMENT

आफ्रो-आशिया चषक (Afro Asia Cup) ही भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या आशियाई क्रिकेट देशांमधील खेळाडू आणि दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया यांसारख्या आफ्रिकन देशांतील खेळाडूंमध्ये खेळली जाणारी क्रिकेट मालिका होती. ही स्पर्धा 2005 आणि 2007 मध्ये दोनदा खेळली गेली, ज्यामध्ये 2005 मधिल मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली, तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना पावसामुळे खेळला गेला नाही, तर 2007 च्या आवृत्तीत एक T20 सामना आणि 3 एकदिवसीय सामने खेळले गेले. आशिया इलेव्हनने एकदिवसीय सामन्यांमध्ये आफ्रिकन इलेव्हनला व्हाईटवॉश दिला होता. T20 सामना देखील जिंकला होता, त्या सामन्याला अधिकृत टी-२० सामन्याचा दर्जा मिळालेला नव्हता.

आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष सुमोद दामोदर आणि विकास समिती महिंदा वल्लीपुरम एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यात एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत ठरवले गेले की आगामी आवृत्ती, आता टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी जून-जुलैमध्ये होणार आहे. बोर्डाच्या बैठकीत, जो आयसीसी बोर्डावर सहयोगी सदस्य संचालक देखील आहे.

हे वाचलं का?

आगामी आवृत्ती ही टी-२० स्वरुपात खेळवली जाण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी जून-जुलैमध्ये याचे आयोजन केले जाऊ शकते. आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष सुमोद दामोदर आणि विकास समिती महिंदा वल्लीपुरम एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यात एप्रिलमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत याविषयी चर्चा झाली होती. जय शाह हे आयसीसीचे सदस्य देखील आहेत.

ACC कमर्शियल आणि इव्हेंट्सचे प्रमुख प्रभाकरन थनराज म्हणाले, “आम्हाला अद्याप बोर्डांकडून पुष्टी मिळणे बाकी आहे. आम्ही अद्याप श्वेतपत्रिकेवर काम करत असून ती दोन्ही मंडळांसमोर मांडली जाईल. पण आमची योजना भारत आणि पाकिस्तानमधील सर्वोत्तम खेळाडूंनी आशियाई इलेव्हनमध्ये खेळण्यासाठीची आहे. योजना अंतिम झाल्यानंतर आम्ही प्रायोजकत्व आणि प्रसारकांसाठी बाजारात जाऊ. हा आमचा एक मोठा कार्यक्रम असेल.

ADVERTISEMENT

जर सर्व काही योजनेनुसार झाले तर ते भारत आणि पाकिस्तानच्या बोर्डांमधील चांगले संबंध दर्शवू शकते. प्रभाकरन थनराज म्हणाले, “मला या दोन्ही देशांच्या खेळाडूंना एकत्र खेळताना पाहायला आवडेल. मला खात्री आहे की असे घडावे आणि सर्व खेळाडूंनी राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. पाकिस्तान आणि भारताच्या खेळाडूंना एकाच संघात खेळताना पाहणे ही एक सुंदर गोष्ट असेल.”

ADVERTISEMENT

BCCI ने ACC च्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे, जय शाह यांच्या नेतृत्वाखाली, जे या वर्षाच्या अखेरीस ICC अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार असणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT