Virat-Rohit मधला अंतर्गत वाद कॅप्टन्सी सोडण्यासाठी कारणीभूत? कोहलीच्या ‘त्या’ मागणीवर BCCI नाराज

मुंबई तक

विराट कोहलीने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. गुरुवारी संध्याकाळी विराटने आपण टी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडण्याचं जाहीर केलं. वर्कलोड मॅनेजमेंटचं कारण देत विराटने यापुढे फक्त वन-डे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं. परंतू विराटच्या या निर्णयामागे रोहित-विराटमधला अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचं बोललं जातंय. विराटने अचानक जाहीर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विराट कोहलीने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. गुरुवारी संध्याकाळी विराटने आपण टी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडण्याचं जाहीर केलं. वर्कलोड मॅनेजमेंटचं कारण देत विराटने यापुढे फक्त वन-डे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं.

परंतू विराटच्या या निर्णयामागे रोहित-विराटमधला अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचं बोललं जातंय. विराटने अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीच्या निर्णयाआधी पडद्यामागे काही हालचाली घडल्या ज्यामुळे बीसीसीआय विराटवर नाराज असल्याचं बोललं जातंय.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीने रोहित शर्माला वन-डे आणि टी-२० संघाच्या उप-कर्णधार पदावरुन हटवावं यासाठी निवड समितीशी चर्चा केल्याचं कळतंय. रोहित शर्माचं वय आता ३४ असल्यामुळे विराटला वन-डे संघासाठी लोकेश राहुल तर टी-२० संघासाठी ऋषभ पंत हा उप-कर्णधार हवा होता. BCCI ने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नसली तरीही विराटच्या या मागणीवर संघटनेतील काही अधिकारी नाराज झाल्याचं समोर येतंय.

बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “जर भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी केली नाही तर आपलं कर्णधारपद जाणार आहे याची विराटला कल्पना आलेली होती. यामुळेच त्याने स्वतःवरचं दडपण थोडसं कमी केलं, यापुढे तो टी-२० संघात एक खेळाडू म्हणून असेल. विराट कोहली जर टी-२० स्पर्धेत कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत नसेल तर वन-डे मधून त्याच्याकडून अपेक्षा कशी करता येईल?”

हे वाचलं का?

    follow whatsapp