आणखी एका मित्रावर गांगुली सोपवणार महत्वाची जबाबदारी, लक्ष्मणकडे NCA चं संचालकपद जाण्याची शक्यता
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आपल्या आणखी एका जवळच्या मित्रावर महत्वाची जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहेत. राहुल द्रविडला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नियुक्त केल्यानंतर NCA (National Cricket Academy) च्या संचालकपदासाठी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण याच्या नावाचा विचार केला जातो आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व काही ठरवल्याप्रमाणे घडलं तर लक्ष्मण लवकरच एनसीएच्या संचालकपदाची सूत्र आपल्या हातात घेईल. बीसीसीआयमधील सूत्राने इंडिया टुडेला दिलेल्या […]
ADVERTISEMENT
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आपल्या आणखी एका जवळच्या मित्रावर महत्वाची जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहेत. राहुल द्रविडला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नियुक्त केल्यानंतर NCA (National Cricket Academy) च्या संचालकपदासाठी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण याच्या नावाचा विचार केला जातो आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व काही ठरवल्याप्रमाणे घडलं तर लक्ष्मण लवकरच एनसीएच्या संचालकपदाची सूत्र आपल्या हातात घेईल.
ADVERTISEMENT
बीसीसीआयमधील सूत्राने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मणसोबत यासंबंधी चर्चा सुरु आहे. राहुल द्रविडनंतर बीसीसीआय त्याच्यासारखाच एखादा व्यक्ती NCA मध्ये संचालक पदावर हवा आहे. राहुल द्रविडप्रमाणेच लक्ष्मणही या जबाबदारीसाठी तयार नव्हता परंतू चर्चेअंती तो यासाठी तयार झाला असून याबद्दलची घोषणा लवकरण करण्यात येईल अशी माहिती कळते आहे.
सध्याच्या घडीला लक्ष्मण स्थानिक क्रिकेटमध्ये बंगालच्या संघाचा फलंदाजी मार्गदर्शक असून तो सनराईजर्स हैदराबाद संघाचा कोच म्हणून काम करतो.
हे वाचलं का?
भारतीय संघातल्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक म्हणून लक्ष्मणची ओळख आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १३४ सामन्यांमध्ये १७ शतकांसह त्याने ८ हजार ७८१ धावा केल्या आहेत. राहुल द्रविडच्या काळात NCA ने आश्वासक कामगिरी करत भारताच्या तरुण पिढीतल्या खेळाडूंना चांगलं तयार केलं होतं. याच कारणामुळे भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तरुण खेळाडूंसह श्रीलंका दौरा केला होता. त्यामुळे लक्ष्मणच्या नेमणुकीबद्दल बीसीसीआय आता कधी अधिकृत निर्णय जाहीर करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
प्रशिक्षक म्हणून शास्त्री गुरुजींच्या जमेच्या बाजू माहिती आहेत का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT