Asia Cup 2022 : रात्रीत पालटलं नशीब! भारतीय संघात संधी मिळालेला कुलदीप सेन कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आशिया कप-2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने अचानक एक निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने वेगवान गोलंदाज कुलदीप सेनचा नेट बॉलर म्हणून संघातसमावेश केला आहे. IPL-2022 मध्ये कुलदीप राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. त्याच्या वेगवान चेंडूंनी सर्वांना प्रभावित केलेलेआहे.

कुलदीपचा संघात नेट गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे म्हणजेच तो संघाच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करेल आणि त्यांना सराव करण्यास मदत करेल. अलीकडच्या काळात बीसीसीआय हे सातत्याने करत आहे. नेटमध्ये सराव करण्यासाठी काही गोलंदाजांना स्वतंत्रपणे घेऊन जात आहे.

कुलदीप सेन हा पूर्णवेळ पर्याय नाही

इनसाइडस्पोर्ट या वेबसाइटने आपल्या अहवालात बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने कुलदीप संघात सामील झाल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर दीपक चहरच्या दुखापतीबाबत घडणाऱ्या गोष्टींवरही त्यांनी भाष्य केले आहे. वेबसाइटनेबीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे “हे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे (दीपक चहरच्या दुखापतीबद्दल बोलणे). तो अजूनही दुबईत संघासोबत आहे. त्याने काल सराव केला आणि आजही करत आहे. तो एकदम बरा आहे. कुलदीप हा नेटगोलंदाज म्हणून संघाशी जोडला गेला आहे. तो एक उत्तम गोलंदाज आहे पण पूर्णवेळ पर्याय नाही.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कुलदीप सेनचा संघर्षमय प्रवास, वडिलांचे केस कापण्याचे दुकान

कुलदीप सेन देशांतर्गत क्रिकेट मध्य प्रदेशकडून खेळतो. त्याने 2018-19 मध्ये मध्य प्रदेशसाठी पहिला रणजी सामना खेळला. त्याच्या पहिल्याच रणजी मोसमात त्याला आठ सामन्यांत २५ बळी घेता आले होते. तो मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून असून त्याभागातून आयपीएल खेळणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी ईश्वर पांडे आयपीएल खेळला आहे. पांडेने चेन्नईसुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले. कुलदीपला आयपीएल-2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघातघेतले होते. त्याचे वडील रामपाल सेन हे रेवा येथील सिरमौर चौकात केस कापण्याचे दुकान चालवतात. देशातील रीवा जिल्ह्यातून असून त्या भागातून आयपीएल खेळणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी ईश्वर पांडे आयपीएल खेळला आहे. पांडेने चेन्नईसुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले. कुलदीपला आयपीएल-2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघातघेतले होते. त्याचे वडील रामपाल सेन हे रेवा येथील सिरमौर चौकात केस कापण्याचे दुकान चालवतात.

आयपीलमध्ये कशी आहे कामगिरी?

कुलदीपने जेव्हा आयपीएलमध्ये पाऊल ठेवले तेव्हा तो सुरुवाती पासूनच छाप पाडू शकला. त्याने आयपीएल-2022 मध्ये राजस्थानसाठी एकूण सात सामने खेळले आणि त्याच्या नावावर आठ विकेट्स आहेत. कुलदीपची खासियत म्हणजे त्याचा वेग. तोआयपीएलमध्ये 150 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकू शकतो. त्याच्याकडे चेंडू दोन्ही बाजूंनी (In swing & Out swing) हलवण्याची क्षमता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT