Asia Cup 2023: BCCI ची केएल राहुलवर मेहरबानी का..? ‘या’ खेळाडूंवर अन्याय…

मुंबई तक

ADVERTISEMENT

why bcci favors kl rahul for asia cup 2023 injustice to sanju samson and other players
why bcci favors kl rahul for asia cup 2023 injustice to sanju samson and other players
social share
google news

KL Rahul Injury Asia Cup 2023: मुंबई: आशिया कप 2023 साठी (Asia Cup 2023) आता भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या संघात स्टार ओपनर केएल राहुललाही (KL Rahul) संधी देण्यात आली आहे. मात्र धक्कादायक गोष्ट ही आहे की, आता राहुलच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर आता तो थेट आशिया कपमध्येच खेळताना दिसणार आहे. (why bcci favors kl rahul for asia cup 2023 injustice to sanju samson and other players )

ADVERTISEMENT

निवडीपेक्षाही धक्कादायक

बीसीसीआयकडून राहुलची शस्त्रक्रिया झाल्यानंतर सरावाशिवाय आता भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली आहे. निवड समितीने राहुलची यष्टीरक्षक म्हणून त्याची निवड केली आहे. या त्याच्या निवडीपेक्षाही धक्कादायक ही गोष्ट आहे की, अजूनही राहुल पूर्णपणे बरा झालेला नाही, त्यामुळे त्याच्यावर झालेली शस्रक्रिया ही त्याच्यासाठी त्रासदायकही असू शकते.

क्रिकेटप्रेमींच्या मनात प्रश्नांचे काहूर

निवड समितीने राहुलचा यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश केला असला तरी क्रिकेटप्रेमींच्या मनामध्ये मात्र एक सवाल उपस्थित हो शकतो की, संजू सॅमसनसारख्या तंदुरुस्त यष्टीरक्षकाकडे दुर्लक्ष करून राहुलकडेच एवढे लक्ष का दिले गेले आहे? तसेच बीसीसीआय राहुलवर एवढी मेहरबानी का करत आहे? असा सवालही क्रिकेटप्रेमींच्या मनामध्ये उपस्थित येऊ शकतो. तर किक्रेटप्रेमींच्या मनात आलेल्या शंकेच उत्तर शोधायचंच म्हटले तर बीसीसीआय आणि निवड समितीला गेल्या काही काळापासून राहुलमध्ये त्यांना कर्णधारही दिसत असण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

राहुलच्या खेळाबद्दल अनेक तज्ज्ञांनी त्याच्या खेळाचे आणि त्याच्या स्टाईलचे कौतुक केले आहे. तर अनेक वेळा राहुलकडे कर्णधारपदही दिलं गेले आहे.

हे ही वाचा >> Crime News : प्रेमात वेडा झाला अन् मर्डर केला, गर्लफ्रेंसाठी तरुणाला घातल्या गोळ्या

पदार्पणातच राहुलची चमक

राहुलने डिसेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मेलबर्न टेस्टपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने वेगळी चमक दाखवली आहे. त्यानंतर आरंभीच्या 6 टेस्ट मॅचमध्ये त्याने तीन शतकं झळकावली होती.

ADVERTISEMENT

पहिल्याच सामन्यात नाबाद

त्यानंतर 11 जून 2016 मध्ये झिबॉम्बेविरुद्ध वनडेमध्येही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या पहिल्या मॅचमध्येच राहुलने आपल्या पहिल्याच सामन्यात नाबाद 100 धावांचे शतक झळकावले होते. तर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत असतानाच राहुलने चौथ्या सामन्यातच शतक झळकावले होते आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 110 धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या खेळाची वेगळी चमकही त्याने दाखवून दिली होती.

ADVERTISEMENT

खेळाचा आलेख हा चढताच

राहुलने आपल्या खेळाचे सर्व सामान्यात नाविन्य दाखवले असल्यामुळेच त्याच्या खेळाचा आलेख हा चढताच राहिला होता. त्यावेळी महेंद्र सिंग धोनीनंतर मात्र विराट कोहलीकडे कर्णधारपद देण्यात आले होते. सध्या कोहली 34 तर रोहित शर्मा 36 वर्षाचा आहे. त्यामुळे दोघांच्या वयाचा विचार केला असता आता बीसीसीआय मात्र कर्णधार म्हणून केएल राहुलकडे बघत आहे.

‘या’ सगळ्याचा परिणाम खेळावर

राहुलकडे बीसीसीआय कर्णधार म्हणून पाहत असले तरी त्याला लागलेला मार आणि त्याच्या झालेल्या शस्त्रक्रियेमुळे मात्र तो कधी संघात तर कधी संघाबाहेर राहिला आहे. या सगळ्याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला आणि त्याच्या चाहत्यांना तो चांगला खेळत नसल्याचेच त्यांना वाटू लागले.

हे ही वाचा >> Praggnanandhaa :बुद्धीबळ विश्वचषकावर मॅग्नस कार्लसनने कोरलं नाव, प्रज्ञाननंद ठरला उपविजेता

खेळावर काळा डाग

एकीकडे त्याने आपल्या खेळाचे वेगळेपण दाखवले होते, तर दुसरीकडे त्याच्या खेळावर एक प्रकारचा डागही लागला की, तो फक्त कमकुवत झिबॉम्बे आणि बांग्लदेशाबरोबर फक्त तो चांगल्या धावा काढू शकतो मात्र बलाढ्य संघापुढे मात्र तो अपयशी ठरतो अशषी टीकाही त्याच्यावर झाली आहे.

राहुलचे क्रिकेट करियर

  1. 47 कसोटी: 2642 धावा – 7 शतके
  2. 54 वनडे: 1986 धावा – 5 शतके
  3. 72 T20 सामने: 2265 धावा – 2 शतके

बीसीसीआयची राहुलवर मेहरबानी

केएल राहुल सध्या 31 वर्षाचा आहे. त्यातच आता रोहित नंतर भारताचा पुढचा कर्णधार म्हणून बीसीसीआय राहुलकडे बघत आहे. तर दुसरीकडे क ऋषभ पंतही आता कर्णधारपदाचा दावेदार असल्याचे सांगितले जाते आहे मात्र त्याच्या कार अपघातनंतर तोही बाहेर आहे. तर वन डे आणि T20 मध्ये हार्दिक पंड्याच्या रुपामध्ये पुढचा कर्णधार दिसत असला तरी ही कर्णधारपदाच्या माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे चित्र अजून स्पष्ट झाले नाही.

या सर्व कारणामुळेच बीसीसीआयने आशिया कपमध्ये संजू सॅमसनपेक्षा राहुललाच अधिक पसंदी दिली आहे. त्यामुळेच बीसीसीआय राहुलवर अधिक प्रेम दाखवत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT