Ind Vs Aus: पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल? ‘हा’ प्लेयर खेळण्याची शक्यता

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ind vs Aus : भारताचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज (Mohammad Shami) मोहम्मद शमीला अहमदाबाद येथे 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) चौथ्या कसोटीत संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत इंदूरमध्ये (Indore) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीतून शमीला विश्रांती देण्यात आली होती. भारतीय संघ व्यवस्थापनाने मेडिकल स्टाफच्या सल्ल्यानुसार, आयपीएल (IPL) चे बहुतेक सामने खेळलेल्या आणि एकदिवसीय वर्ल्ड कपच्या योजनेत सहभागी असलेल्या वेगवान गोलंदाजांसाठी वर्कलोड मॅनेजमेंटची योजना तयार केली आहे. May faster bowler Mohammad shami will play in 4th test against Australia

ADVERTISEMENT

Ind VS Aus : इंदूर टेस्ट 3 दिवसात संपली; खेळपट्टीबाबत ICC ने केली ही कारवाई

शमीने पहिले दोन कसोटी सामने खेळले आहेत आणि तो एकदिवसीय संघाचाही भाग आहे. इंदूर कसोटीत त्याच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला होता. सिराजने पहिल्या तीन कसोटींमध्ये केवळ 24 षटके टाकली आहेत आणि 17 ते 22 मार्च दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीनही एकदिवसीय सामन्यांमध्ये तो प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटीत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. शमी या मालिकेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने दोन सामन्यांमध्ये 30 षटके टाकली असून सात विकेट्स घेतल्या आहेत. मोटेराच्या ड्राय पिचवर त्याची गरज भासेल. अशा पीच रिव्हर्स स्विंगसाठी अनुकूल असतात.

हे वाचलं का?

भारत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे . जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी थेट पात्र होण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागेल. इंदूरमधील होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीला ICC (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी ‘खराब’ रेट दिले होते. पण गुजरात क्रिकेट असोसिएशनला (GCA) अशी कोणतीही जोखीम पत्करायला आवडणार नाही.

Ind Vs Aus : इंदूर कसोटीतील पराभव भारताला ठरणार महाग; जाणून घ्या कारण

ADVERTISEMENT

राज्य संघच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “आम्हाला भारतीय संघ व्यवस्थापनाकडून (खेळपट्टीबाबत) कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत आणि आमचे स्थानिक क्युरेटर्स आम्ही संपूर्ण हंगामात केल्याप्रमाणे सामान्य खेळपट्टी तयार करत आहेत.” “खरं तर, जानेवारीमध्ये येथे झालेल्या शेवटच्या रणजी सामन्यात, रेल्वेने प्रथम फलंदाजी करताना 500 (508) पेक्षा जास्त धावा केल्या. गुजरात संघाने डावाने पराभव पत्करूनही दोन्ही डावात 200 हून अधिक धावा केल्या. यावेळीही काही वेगळे होणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT