WPL 2023: दहावीतील मुलगी गाजवणार वुमन प्रीमियर लीग!
Shabnam Shakil: नवी दिल्ली: महिला क्रिकेटसाठी शनिवार हा ऐतिहासिक दिवस असेल. कारण महिला प्रीमियर लीग (WPL) 4 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात जायंट्स यांच्यात आहे. विशेष म्हणजे, दहावीत शिकणारी एक मुलगी या सामन्यात दिसू शकते. गुजरात जायंट्सच्या संघात शबनम शकील (shabnam shakil) ही अवघ्या 15 वर्षांची मुलगी आहे. […]
ADVERTISEMENT
Shabnam Shakil: नवी दिल्ली: महिला क्रिकेटसाठी शनिवार हा ऐतिहासिक दिवस असेल. कारण महिला प्रीमियर लीग (WPL) 4 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात जायंट्स यांच्यात आहे. विशेष म्हणजे, दहावीत शिकणारी एक मुलगी या सामन्यात दिसू शकते. गुजरात जायंट्सच्या संघात शबनम शकील (shabnam shakil) ही अवघ्या 15 वर्षांची मुलगी आहे. ती सोनम यादव हिच्यासह सर्वात कमी वयाची क्रिकेटपटू आहे. शबनमचा जन्म 17 जून 2007 रोजी झाला. ती आंध्र प्रदेशचे मूळ रहिवासी असून शिव सीओनी स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात आहे. ती फलंदाज आणि मध्यम वेगवान गोलंदाज आहे. तिला गुजरात जायंटने 10 लाख रुपयांना बोली लावून आपल्या संघात घेतलं आहे. (wpl 2023 10th class student shabnam shakil will rock the woman premier league)
ADVERTISEMENT
अशी पडली क्रिकेटच्या प्रेमात
शबनम शकील हिचं क्रिकेटवर नेमकं प्रेम कसं जडलं याची खूपच रंजक कहाणी आहे. तिला तेव्हा क्रिकेटमध्ये रस वाटू लागला जेव्हा तिने तिच्या वडिलांनी क्लब क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून खेळताना पाहिलं. त्यावेळी ती फक्त आठ वर्षांची होती. क्रिकेटच्या उत्कटतेच्या दृष्टीने तिच्या वडिलांनी तिला विशाखापट्टणमच्या एनएडी Academy मध्ये प्रवेश मिळवून दिला. प्रशिक्षक नागराजू यांनी तिला अकादमीमध्ये प्रशिक्षण दिलं. संध्याकाळी ती सतीश रेड्डी आणि कृष्णा राव यांच्या मार्गदर्शनाखाली विशाखापट्टणम जिल्हा क्रिकेट असोसिएशन (व्हीडीसीए) च्या मैदानावर क्रिकेट खेळत असते.
110 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता
110 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता शबनममध्ये आहे. ती अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करते. त्यामुळे ती धावाही कमी देते. यामुळेच प्रादेशिक स्तरावर क्रिकेट खेळताना भारतीय निवडकर्त्यांचे लक्ष तिच्याकडे गेलं. त्यानंतर ती 25 इतर मुलींसह नॅशनल क्रिकेट Academy गेली.
हे वाचलं का?
Murali Vijay: क्रिकेटर मुरली विजयने दिनेश कार्तिकच्या बायकोशी केलेलं लग्न!
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जबरदस्त गोलंदाजी
शबनम ही भारताच्या Under-19 महिला संघाची देखील सदस्य आहे. तिने 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिकाही खेळली आहे. 27 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 या काळात मुंबईच्या एमसीए वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ही मालिका आयोजित करण्यात आली होती. यासह, तिने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर चमकदार गोलंदाजी करताना 7 विकेट घेतल्या होत्या.
ADVERTISEMENT
Smriti Mandhana: भावामुळे क्रिकेटर बनण्याचं पाहिलं स्वप्न… असा आहे ‘नॅशनल क्रश’ पर्यंतचा प्रवास
ADVERTISEMENT
अंडर-19 टी-20 विश्वचषक संघातही होता समावेश
शबनम ही 2023 मध्ये भारतीय महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक संघातही होती. पण शबनमला या स्पर्धेतील केवळ दोन सामन्यांमध्येच खेळण्याची संधी मिळाली. आंध्र प्रदेश महिला, भारत ए महिला अंडर-19, भारत बी महिला अंडर-19 आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांचे प्रतिनिधित्व शबनम हिने केले आहे. झुलन गोस्वामी आणि जसप्रीत बुमराह हे शबनमचे आवडते खेळाडू आहेत.
WPL 2023 : आजपासून महिला प्रीमियर लीगची सुरुवात; या दोन संघात होणार भिडत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT