WTC Final जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 444 धावांचे लक्ष्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Australia's second innings declared, Team India got a big target of 444 runs
Australia's second innings declared, Team India got a big target of 444 runs
social share
google news

WTC Final India vs Australia : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्य़ा (WTC Final) फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) दुसरा डाव 8 विकेट गमावून 270 धावांवर घोषित केला आहे. त्यामुळे आता टीम इंडियासमोर (Team India) आता 444 धावांचे लक्ष्य असणार आहे. हे लक्ष्य आता टीम इंडियाला आजचा अर्धा दिवस आणि उद्याच्या दिवसात पूर्ण करावे लागणार आहे. टीम इंडियाला हे लक्ष्य पूर्ण करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकता येणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आता हे लक्ष्य पूर्ण करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर नाव कोरते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (wtc final ind vs aus declare there second inning team india got 444 target)

ऑस्ट्रेलियाचा (Australia) पहिला डाव 469 धावांवर ऑल आऊट झाला होता. या पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथने 121 धावा आणि ट्रेविस हेडने 163 धावांची सर्वांधिक खेळी केली होती. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 469 धावा केल्या होत्या. यानंतर टीम इंडियाचा (Team India) पहिला डाव सूरू झाला होता. मात्र टीम इंडियाचे सलामीवीर सपशेल अपयशी ठरले होते. अजिंक्य रहाणेच्या 89 आणि शार्दुल ठाकूरच्या 51 अर्धशतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाला 296 धावांपर्यंत मजल मारावी लागली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर 173 धावांची आघाडी होती.

हे ही वाचा : WTC Final : अजिंक्य रहाणेचं शतक! कसोटीत घेतल्या 100 कॅच

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी झटपट विकेट काढायला सुरुवात केली. मात्र टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला ऑल ऑऊट करता आले नाही आणि चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 8 विकेट गमावून 270 वर दुसरा डाव घोषित केला होता. ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स केरीने सर्वांधिक 66 धावा करून नाबाद राहिला. आता ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावातली 173 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावात 270 धावा, असे मिळून आता ऑस्ट्रेलियाने 443 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर नाव कोरण्यासाठी 444 धावांचे लक्ष्य़ असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

टीम इंडियाकडे आता विजयासाठी आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा संपूर्ण दिवस असणार आहे. या दिवसात टीम इंडियाला 444 साऱख्या बलाढ्य धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आता टीम इंडिया ही धावसंख्या गाठून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर नाव कोरते? याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष असणार आहे. तसेच टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद मिळून 10 वर्ष झाली आहेत. त्यामुळे जेतेपदाचा दुष्काळ दूर करण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे.

हे ही वाचा : WTC Final, Ind vs Aus : काळी पट्टी बांधून खेळाडू मैदानात, ओडिशा रेल्वे अपघाताशी कनेक्शन

    follow whatsapp

    ADVERTISEMENT