Asia Cup 2023: आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ 17 जणांना स्थान
BCCI ने आशिया कप 2023 साठी आपला 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेतील इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना हे आकर्षण आहे. त्यामुळे या सामन्यात कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT

Indian Squad for Asia Cup 2023: नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया कप 2023 साठी आपला संघ जाहीर केला आहे. अजित आगरकर यांनी 21 ऑगस्ट (सोमवार) रोजी दिल्लीत संघाची घोषणा केली. यावेळी रोहित शर्माही उपस्थित होता. 17 सदस्यीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असेल. केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर भारतीय संघात परतले आहेत. तर युवा फलंदाज तिलक वर्मालाही संघात संधी मिळाली आहे. पण संजू सॅमसनला संघात स्थान मिळालेले नाही. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र त्याला उपकर्णधारपदावर कायम ठेवण्यात आले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2 सप्टेंबरला आशिया चषकात पहिला सामना खेळणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे. यानंतर भारताचा दुसरा गट सामना 4 सप्टेंबर रोजी नेपाळशी होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एकाच गट-अ मध्ये आहेत. आशिया कप पाकिस्तानच्या यजमानपदावर हायब्रिड मॉडेलच्या आधारे खेळवला जात आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा 17 सदस्यीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव , ईशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.
हे ही वाचा >> Sana Khan Murder : सना, सेक्स्टॉर्शन आणि ग्राहकांसोबत संबंध; पोलिसांच्या हाती स्फोटक माहिती
बीसीसीआयच्या यादीनुसार, रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन आणि तिलक वर्मा या आठ विशेषज्ञ फलंदाजांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. इशान आणि केएल राहुल यांपैकी एक विकेटकीपिंग करण्याची शक्यता आहे.